घरलाईफस्टाईलबैठक मांडा, फरक अनुभवा!

बैठक मांडा, फरक अनुभवा!

Subscribe

आधुनिकीकरणासोबत लोकांच्या जीवनातही अनेक बदल झाले आहेत. पूर्वी जेवण्यासाठी खाली जमिनीवर मांडी घालून बसायचे. आता अनेकांच्या घरात डायनिंग डेबल स्थिरावला आहे. लाईफस्टाईलच्या बदलामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जमिनीवर जेवायला बसण्याचे अनेक फायदे आहेत. ती स्टाईल नसून एक पचन प्रक्रिया आहे. पण अलिकडे लोक याकडे जुनी पद्धत म्हणून बघतात. जाणून घेऊया खाली बसून जेवण्याचे फायदे...

* जमिनीवर बसून जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते. जमिनीवर ताट असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी सतत वाकावे लागते. यामुळे शरीराची हालचाल होऊन अन्न योग्य पद्धतीने पचते. जमिनीवर बसून जेवल्यास वजन कमी करण्यास मदत होते. तसेच पोट सुटत नाही. अपचन, जळजळ असे पोटासंबंधित विकारही दूर राहतात.

* मांडी घालून बसल्याने शरीराच्या नसांचा थकवा कमी होतो. डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्यास शरीरात होणारा रक्तप्रवाह सुधारतो. शरीराची लवचिकता वाढते. आपण जेव्हा जमिनीवर बसून जेवत असतो तेव्हा पाठीचा कणा ताठ राहतो. तसेच पोट, पाठ, खाद्यांची सतत हालचाल होत राहते.

- Advertisement -

* सुखासन किंवा मांडी घालून जमिनीवर बसने आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण करण्यापासून वाचता येते. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. खाली बसून जेवल्याने जेवढे आवश्यक आहे तेवढेच आपण अन्न ग्रहण करतो . त्यामुळे पचन तंत्र सुरळीत चालते आणि लठ्ठपणा कमी करण्यास सहाय्य्यता करते व व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते.

* पाठीचा कणा ताठ व मजबूत होतो आणि पाठीचे रोग पण दूर होतात. तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावर जास्त लक्ष असते. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळते की आपले पोट भरले. खुर्चीवर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे पण जात असतो. त्यामुळे जेवण करीत असताना पाचन तंत्र सुरळीत काम करीत नाही. त्यामुळे अपचन, अ‍ॅसिडिटी व इतर रोगांना आमंत्रण दिले जाते.

- Advertisement -

* मांडी घालून बसणे योगाचीच एक क्रिया आहे. या प्रकारे बसून जेवल्याने जेवण योग्य प्रकारे पचन होते. खाली बसून जेवण करताना घास घेण्यासाठी वाकावे लागते आणि नंतर पुन्हा आपण ताठ होतो. असे जास्त वेळा केल्याने पोटातील स्नायू अ‍ॅक्टिव्ह होतात त्यामुळे पचण्याची गती वाढते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -