कुर्ती निवडताना…

Mumbai
Kurti

ऑफिसपासून ते हँगआऊट, फंक्शन्सपर्यंत कुठेही सहज कॅरी करता येणारी कुर्ती महिलावर्गात लोकप्रिय आहे. मात्र, कुर्ती निवडताना तसेच परिधान करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

शॉर्ट कुर्ती, लाँग कुर्ती – कुर्तीसाठी लेगिंग्स हा बेस्ट ऑप्शन असतो. मात्र, लेगिंग्ससोबत शॉर्ट कुर्ती शोभून दिसत नाही. यामुळे तुमचे बट्स हेवी दिसू शकतात. त्यामुळे पटियालासोबत तुम्ही शॉर्ट कुर्ती परिधान करायला हवी, तर लेगिंग्ससोबत नॉर्मल लेंथची कुर्ती निवडावी.

कुर्तीची साईज – अनेकदा सैल कुर्तीत आपण सडपातळ दिसू असा अनेकींचा समज असतो, पण असे मुळीच नाहीये. सैल कुर्तीत तुम्ही अधिक लठ्ठ दिसू शकता. त्यामुळे आपल्या साइजनुसारच कुर्तीची निवड करा.

कॉटन कुर्ती बेस्ट – कुर्ती निवडताना त्याच्या फेब्रिकची योग्य निवड करणे गरजेचे आहे. लाइक्रा आणि जर्सी फेब्रिक्सऐवजी कॉटन फेब्रिकची निवड कधीही योग्य.

स्लीवलेस कुर्ती – केवळ कुर्तीच नव्हे तर त्याचे स्लीव्जसुद्धा तुमच्या बॉडी टाइपनुसार असणे गरजेचे आहे. जर तुमचे आर्म्स जाड असतील, तर तुम्ही केप स्लीव्जची निवड करू शकता. योग्य फिटिंग अर्थातच या स्लीव्ज तुम्हाला शोभून दिसू शकतील. जर स्लीवलेस कुर्ती तुम्ही परिधान करू इच्छित असाल, तर V-neck कुर्ती कॅरी करा.

रंग निवडताना – तुमच्या कुर्तीचा लूक बिघडवू शकतात. जर तुम्ही लठ्ठ असाल, तर ब्राइट कलर्समध्ये तुम्ही आणखीनच जास्त लठ्ठ दिसू शकता. त्यामुळे असे रंग निवडू नका. जर तुम्हाला ब्राइट कलरच हवा असेल तर त्या कलरमध्ये प्रिंटेड कुर्तीची निवड करा.