घरलाईफस्टाईलकोरोना टाळण्यासाठी 'या' सवयी टाळा

कोरोना टाळण्यासाठी ‘या’ सवयी टाळा

Subscribe

कोरोनापासून वाचण्यासाठी या सवयी टाळा

कोरोना विषाणूने अक्षरश: देशात कहर केला आहे. या विषाणूपासून दूर राहण्यासाठी अनेक उपाय केले जाता. मात्र, आपल्यातील काही सवयी आहेत. त्यादेखील बदलणे गरजेचे आहे. जर तुम्हाला कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या जोखमीपासून दूर रहायचे असेल तर या सवयी लवकरात लवकर सोडणे गरजेचे आहे.

सातत्याने चेहऱ्याला हात लावणे

- Advertisement -

अनेकांना सतत चेहऱ्याला हात लावण्याची सवय असते. त्यामुळे कोणताही जंतू किंवा विषाणू पृष्ठभागावर सहजपणे जगू शकतो. त्यामुळे सतत चेहऱ्याला हात लावणे टाळणे फार महत्त्वाचे आहे.

नखे कुरतडणे

- Advertisement -

बऱ्याच जणांना नखे कुरतडण्याची सवय असते. त्यामुळे नखांच्या आत सर्व प्रकारचे कीटक आढळतात. अशा वेळी नखे थेट तोंडात घातल्याने जीवाणू आणि विषाणू सहजपणे आपल्या शरीरात आत प्रवेश करतात. त्यामुळे तुम्हाला नखे ​कुरतडण्याची सवय असेल तर, ती शक्य तितक्या लवकर सोडा.

केसात बोट फिरवणे

बहुतेक स्त्रियांना केसांमध्ये बोटं फिरवण्याची सवय असते. जर तुम्हाला अशी सवय असेल तर ती आताच सोडा. जर आपले केस लांब असतील तर ही सवय लवकरात लवकर सोडा. या सवयीमुळे, व्हायरस आपल्या हातात येण्याची शक्यता आहे. आणि नंतर तो नाक आणि तोंडातून हाताने संपूर्ण शरीरात पसरु शकतो.

बेडशीट साफ न करणे

जर आपण आपली बेडशीट दोन आठवड्यांत धुत नसाल तर आपल्याला ही सवय बदलण्याची आवश्यकता आहे. कोरोना काही पृष्ठभागावर कित्येक दिवस जिवंत राहू शकतो. म्हणून आपल्या शरीराच्या संपर्कात येणारे कपडे, नियमितपणे धुतले जाणे आवश्यक आहे.

अन्न शेअर करणे

कोरोना विषाणूचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असतो. त्यामुळे अशा संक्रमण काळात अन्न शेअर करणे चांगले नाही. त्यामुळे आधीच ताटात थोडे अन्न घ्या. जेणे करुन ते अन्न वाया जाणार नाही.


हेही वाचा – उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणार ‘हे’ घरगुती पदार्थ लाभदायक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -