झुम्बा डान्सचे ‘हे’ फायदे जाणून घ्या

Mumbai

दररोजच्या प्रवासात आपण तनावमुक्त होण्यासाठी एखादे गाणे ऐकतं असतो. गाणे ऐकल्यामुळे आपले मन प्रसन्न देखील होते. तसेच डान्सचे आहे. डान्समुळे आपला मूड हा फ्रेश होतो आणि शरीरातील स्नायू लवचिक होतात. डान्स फक्त वजन कमी करण्यासाठी केला जातो असे नाही तर आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचा हेल्दी राहण्यासाठी देखील केला जातो.

भारतातील पारंपरिक नृत्यप्रकारानंतर वेगवेगळे डान्सचे प्रकार भारतात येऊ लागले आहेत. अनेकांना आंतरराष्ट्रीय डान्स प्रकारांनी वेड लावलं आहे. त्यामध्ये हिप हॉप, सालसा, जॅस अशा प्रकारचे डान्स प्रकार आहेत. तसेच आता सर्वांना झुम्बा डान्सने वेड लावलं आहे. झुम्बा डान्स हा एक एरोबिक्स डान्स प्रकार आहे. हा डान्स दक्षिण अफ्रिकाच्या संगीतावर तयार झाला आहे. झुम्बा डान्स हा इतर डान्स प्रकारापेक्षा सोपा आहे. बेली डान्सनंतर जगभरातील सर्वाधिक लोकांनी झुम्बा डान्सला प्राधान्य दिले आहे.

झुम्बा डान्सचे फायदे

  •  झुम्बा डान्स हा तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करतो.
  •  हा डान्स प्रकार व्यवस्थित केला तर एका तासात ४०० ते ६०० कॅलरीज बर्न होतात. तसेच ब्लड प्रेशरची समस्या ही या डान्समुळे दूर होते.
  •  झुम्बा डान्समुळे शरीरातील प्रत्येक अवयवावर चांगले परिणाम होतात.
  •  पचनसंस्था सुरळीत चालू राहते.
  •  या डान्समुळे आपले शरीर संतुलित राहते, आत्मविश्वास वाढतो आणि शरीर लवचिक बनवते.
  •  शरीराच्या प्रत्येक भागाच्या सौम्य हालचाली करण्यास झुम्बा डान्स मदत करतो.