घरताज्या घडामोडी'या' व्यक्तींनी अजिबात खाऊ नये लसूण

‘या’ व्यक्तींनी अजिबात खाऊ नये लसूण

Subscribe

लसणाचे आयुर्वेदात खूप फायदे सांगितले आहे. कोणी लसू कच्चा खातात तर कोणी भाजीत किंवा चटणी करू खातात. कोणत्याही पदार्थात लसूण घातल्यावर पदार्थाची चव वेगळीच लागते. लसणाचा वापर पचन तंत्रासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यसाठी श्रेष्ठ मानले जातात. लसणाची मूळ चव तिखट आहे. पण लसणात सहा रसाचा समावेश आहे. लसणीचे मूळ तिखट, पाने कडू, देठ खारट, नाळ तुरट तर बी गोड चवीची असते. यामध्ये फक्त आंबट रस नाही आहे. लसूण खाण्याचे जेवढे फायदे आहे तेवढेच तोटे देखील आहे. त्यामुळे आज आपण कोणत्या व्यक्तींनी लसूण खावू नये हे जाणून घेणार आहोत.

या व्यक्तींनी लसूण खाणे टाळा

- Advertisement -
  • लसूण पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी खाणे टाळावे.
  • तसेच ज्या स्त्रिया गरोदर आहेत त्यांनी देखील लसूण खाऊ नये.
  • नाक आणि तोंडातून रक्त येत असणाऱ्यांना लसणीचे सेवन करू नये.
  • ज्यांच्या प्रकृतीला गरम पदार्थ सहन होत नाही त्यांनी देखील विचार करूनच लसूण खावी. कारण लसूण ही उष्ण असते.
  • तसेच ज्यांना पोटाचे विकार, अतिसार, अॅलर्जी आहे अशा लोकांनी लसणीचे सेवन करू नये.
  • लो ब्लडप्रेशन असणार व्यक्तींनी देखील लसूण खाऊ नये.
  • लसूण खाल्ल्यामुळे रक्त पातळ होत असते. त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया झाल्यावर सुरुवातीच्या काही दिवसात लसूण खाणे टाळावे.

हेही वाचा – भेंडी खाण्याचे लाभदायक फायदे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -