उन्हाळ्यातही रहा फिट, वापरा या टिप्स

आता उन्हाळ्यातही रहा फीट

Mumbai
these tips will help for fit summer session
उन्हाळ्यातही रहा फीट

दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजारदेखील उद्भवत आहेत. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून टपकणार्‍या घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही आणि घशाला सतत पडणारी कोरड या सगळ्यामुळे जीव अगदी हैराण होत असताना अनेक आजार देखील डोके वर काढत आहे. मात्र, अशावेळी देखील फिट राहणे फार गरजेचे आहे. उन्हाळ्यात अनेकदा पचनसंस्था, त्वचेसंबंधातील समस्यांसोबत व्हायरल फिवर, सन स्ट्रोक आणि इन्फेक्शनचाही धोका वाढतो. मात्र काही खास टीप्सचा वापर केल्याने तुम्ही उन्हाळ्यात देखील फिट रहाला. चला तर जाणून घेऊया अशा खास टीप्स

शरीर हायड्रेट ठेवल्याने आजार होतात दूर

जर तुमचे शरीर हायड्रेट असेल तर तुम्ही आजारांपासून ९० टक्के स्वत:च रक्षण करु शकता. पाण्याला शरीराद्वारे आपल्या कोलोनमध्ये शोषून घेण्यात येते. यामुळे पचनसंस्था देखील सुरळीत राहते. उन्हाळ्यामध्ये जास्त तहान लागते आणि नको असलेले पदार्थ शरीरातून घामावाटे बाहेर टाकण्यात येतात. त्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक असते.

फायबर असलेले धान्य आणि फळांचे सेवन करा

बऱ्याच फळांमध्ये आणि धान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर मुबलक प्रमाणात आढळून येते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते आणि बद्दकोष्टसारख्या पोटाच्या समस्या दूर राहतात. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात फायबर असलेल्या फळांचा आहार घ्यावा.

चहा, कॉफीचे सेवन कमी करावे

उन्हाळ्यामध्ये कॅफेनचे सेवनही पचनक्रियावर परिणाम करतात. यामुळे अल्सर, अॅसिडिटी आणि जळजळ यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये चहा आणि कॉफीचे सेवन करणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही दही, ताक आणि ज्यूस यांसारख्या थंड पदार्थांचे सेवन करावे.

आहारावर लक्ष द्या

उन्हाळ्यामध्ये हेल्दी जेवणाचा वापर करावा. उन्हाळ्यात तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे पचनाचा देखील त्रास होत नाही आणि शरीरही हेल्दी राहण्यास मदत होते.

वर्क आऊट करा

शरिरातून घामावाटे नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यासाठी भरपूर वर्क आऊट करण्याची गरज असते. वर्कआऊट केल्यामुळे भरपूर प्रमाणात घाम येतो आणि शरिरातील पाणी घामावाटे बाहेर पडण्यास मदत होते.