गरोदर महिलांनी असा करावा ‘कोरोना’व्हायरसपासून बचाव

Mumbai
these tips will protect pregnant women corona virus
गरोदर महिलांनी असा करावा 'कोरोना'व्हायरसपासून बचाव

गरोदर महिलांच्या प्रतिकारक्षमतेमध्ये आणि शरीरात बदल होत असल्यामुळे विषाणूचा, विशेषता COVID 19 चा श्वसनयंत्रणेत प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. या परिस्थितीत महिलांनी काय काळजी घ्यावी याबद्दल सांगणार आहोत.

करोना विषाणूची लक्षणे

ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये त्या व्यक्तीला न्यूमोनिया, सार्स, मूत्रपिंड निकामी होणे, असे गंभीर परिणाम दिसू लागतात किंवा मृत्यूसुद्धा होतो. त्यामुळे तातडीने वैद्यकीय मदत घेणे हितावह असते.

कोरोनाव्हायरसची लागण कोणाला होऊ शकते?

कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला या आजाराची लागण होऊ शकते. गरोदर महिलांनाही हा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही गरोदर असाल तर घाबरून जाऊ नका. उलट स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करा.

गरोदर महिलांनी काय लक्षात ठेवावे?

जी महिला गरोदर आहे त्या महिलेला फ्ल्यूसारखे विषाणूजन्य श्वसनाचे आजार होण्याची शक्यता असते आणि त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण गरोदर महिलांची प्रतिकारक्षमता कमी असते आणि त्यामुळेच त्यांना विषाणूजन्य आजारांची लागण होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे इतरांच्या तुलनेने गरोदर महिलांनी गंभीर स्वरुपाचा आजार, व्यंग किंवा मृत्यूचीही शक्यता अधिक असते. त्यांना कोरोनाव्हायरसशी संबंधित इतर आजार होण्याचीही शक्यता असते. यात सार्स आणि एमईआरएस-सीओव्ही आणि गरोदरपणात होणाऱ्या इन्फ्ल्यूएंझासारखे इतर विषाणूजन्य श्वसनाचे आजार समाविष्ट आहेत.

 • तुम्ही गरोदर असाल तर प्रवास टाळा. तसेच अस्वस्थ वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण तुमच्या बाळालाही
 • कोरोनाव्हायरसची लागण होऊ शकते.
 • या महत्त्वाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करा.
 • हात सारखे स्वच्छ धुवा. साबण आणि पाण्याने हात वारंवार धुवा किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करा.
 • हात न धुता डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला स्पर्श करू नका.
 • जवळचा संपर्क टाळा. गर्दीच्या ठिकाणी जाऊन नका आणि आजारी लोकांच्या जास्त संपर्कात येऊ नका.
 • तुम्ही आजारी असाल तर घरीच थांबा.
 • खोकताना आणि शिंकताना तोंडासमोर रुमाल धरा किंवा मास्क घाला.
 • वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग स्वच्छ करा. टेबल, दरवाजाच्या मुठी, दिव्यांची बटणे, मोबाईल फोन, हँडल्स,
 • काउंटरटॉप्स, कीबोर्ड, टॉयलेट, नळ आणि डेस्क्स अस्वच्छ ठेवू नका.
 • सार्वजनिक ठिकाणी हात लावल्यावर हात स्वच्छ धुवा.
 • चेहऱ्याला वारंवार हात लावू नका.