घरलाईफस्टाईलघरातील माशा घालवण्यासाठी 'हे' करा उपाय

घरातील माशा घालवण्यासाठी ‘हे’ करा उपाय

Subscribe

पावसाळ्यात घरामध्ये माशांचे प्रमाण प्रचंड वाढते. घरात शिरलेल्या माशा सहजासहजी बाहेर पडत नाहीत. घरात शिरलेल्या माशा सतत घोंगावत असतात यामुळे माशांचा प्रचंड त्रास होतो. मात्र काही घरगुती उपाय केल्यास माशा निघून जाण्यास मदत होते.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात माशा आढळून येतात. या माशा अन्न आणि साचलेल्या पाण्यावर बसतात. यामुळे अन्न आणि पाणी दुषित होते यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रो हे आजार उद्भवण्याची शक्यता असते. मात्र या आजारांपासून तुम्हाला दूर राहायचे असल्यास हे उपाय करा.

तुळस –

प्रत्येकांच्या घरात तुळशीचे रोप हे असतेच. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे घरात माशा येण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ज्यांच्या घरात माशा अधिक प्रमाणात येत असतील अशांनी तुळशीचे रोप जरुर लावावे.

- Advertisement -

कापूर –

धार्मिक कार्यामध्ये वापरण्यात येणारा कापूर माशांवर एक रामबाण उपाय आहे. घरात जास्त प्रमाणात माशा आल्या असतील तर घराच्या चारही बाजूला एक – एक कापराची वडी ठेवल्याने माशा कमी होण्यास मदत होते.

धूप –

काही नागरिक सायंकाळच्या वेळेस धूप पेटवतात. घरामध्ये धूप दाखवल्याने देखील माशा कमी होतात. तसेच पेटत्या धूपामध्ये कापराच्या वड्या टाकल्यास माशा निघून जातात.

- Advertisement -

नैसर्गिक तेल –

लव्हेंडर, पेपरमिंट आणि निलगिरी यासारख्या नैसर्गिक तेलांनी कीटक आणि माशा दूर राहण्यास मदत होते. या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून हा कापूस खिडकी किंवा दरवाज्याच्या बाजूला ठेवल्यास माशा घरात शिरकाव करत नाहीत.

किसुळ –

घरात माशा अल्यास नारळाची किसूळ पेटवून ठेवल्याने होणाऱ्या धूराने माशा पळू जाण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -