घरलाईफस्टाईलनवजात आणि स्तनपान

नवजात आणि स्तनपान

Subscribe

स्तनपान करणे आई आणि बाळ दोहोंच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र नोकरदार महिलांना स्तनपान करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती खालावते. त्यामुळे स्तनपान करताना लक्षात ठेवण्याच्या बाबी पुढीलप्रमाणे…

बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक बाळंतिणीला स्तनपानाचा प्रश्न सतावतो. जन्मानंतर पहिल्या चार महिन्यांत बाळाची दुपटीने वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याची तिपटीने वाढ होणे गरजेचे आहे. सुदृढ, गुटगुटीत बाळासाठी पालकांनी त्याच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. आईचे दूध हेच बाळाच्या सुदृढ वाढीसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मापासून पहिले सहा महिने बाळाला आईचेच दूध मिळाले पाहिजे. अनेकदा पहिल्यांदाच आई होणार्‍या स्रियांना स्तनपानाविषयी अपुरी माहिती असते. याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो.

- Advertisement -

स्तनपान हाच बाळाचा आहार होय. मात्र काही वेळा आईला आरोग्यविषयक तक्रारी भेडसावतात. अशावेळी आईने आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय अशावेळी डॉक्टर्सचा सल्ला नक्की घ्यावा. आईच्या आजारपणात बाळाला बाटलीचे दूध देण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात. जी आई मुलाला अंगावर दूध पाजते, तिला दररोज किमान ५०० कि. ग्रॅ. कॅलरीजची आवश्यकता असते. याशिवाय ४०० मि. ग्रॅ. कॅल्शियम व २० ग्रॅम प्रथिने तिला मिळालेच पाहिजेत. त्यासाठी तिच्या आहारात दूध, दुधाचे पदार्थ, अंडी मांस व ब्रेड आदींचा समावेश असावा.

स्तनपान करणार्‍या प्रत्येक आईने स्तनपानाच्या काळात कॅफिन व मद्य यांचे सेवन टाळावे.अल्कोहाल, कॅफिन किंवा औषधामधील काही अनावश्यक घटकद्रव्य स्तनपानातून बाळाच्या शरीरात गेले तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोजकी औषधे घेतली पाहिजेत. सुरुवातीला दर तीन तासांनी बाळाला स्तनपान करावे. नंतर जसजशी बाळाची वाढ होत जाईल तशी त्याची भूकही वाढेल. तेव्हा मात्र आईला स्तनपानात नियमितपणा आणावा लागेल. मातेच्या दुधात नवजात बालकासाठी आवश्यक ते सर्व पोषक घटक असतात. पहिल्या काही आठवड्यात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा वेळी आईचं दूध बाळाचे सुक्ष्मजीव जंतूपासून संरक्षण करते. अंगावर दूध पाजल्याने बाळाला जठरासंबंधी किंवा पोटाचे विकार उद्भवत नाहीत.

- Advertisement -

अनेकदा कामाच्या गडबडीत आईला स्तनपान करणे शक्य होत नाही. अशावेळी बाळाच्या तोंडात दुधाची बाटली दिली जाते. दूध पीत बाळ झोपी जाते आणि तोंडातील बाटली तशीच बाळाच्या तोंडात राहते. त्यामुळे बाळाचे दात किडतात. कारण दुधात नैसर्गिक शर्करा असते. जिचे आवरण दातावर बसून त्याचा परिणाम दात किडण्यावर होतो. त्यामुळे बाटलीतून दूध पिताना आईने बाळाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -