घरलाईफस्टाईलझोपण्यापूर्वी ‘हे’ पदार्थ खाणं टाळा

झोपण्यापूर्वी ‘हे’ पदार्थ खाणं टाळा

Subscribe

प्रत्येकाला शांत झोप हवी असते. शांत झोपेसाठी तुम्ही झोपण्यापूर्वी घेत असलेल्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी झोपण्यापूर्वी कोणते पदार्थ खावे आणि कोणते पदार्थ खाऊ नये, याची माहिती जाणून घेणार आहोत.

रात्रीचं थकून घरी आल्यानंतर कधी अंथरूणाावर पडतो असं होतं. प्रत्येकाला रात्री पुरेशी झोप मिळणं गरजेचं असतं. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिडेपणा, तणाव यासोबतच आरोग्याच्या इतर अनेक समस्या जाणवतात. रात्री पुरेशी आणि उत्तम झोप मिळावी यासाठी आपण खोली शांतता ठेवणं, खोली थंड ठेवणं या सर्व पद्धतींचा वापर करतो. मात्र, आपण खात असलेल्या खाद्यपदार्थांकडे झोपण्यापूर्वी आपण दुर्लक्ष करतो. मात्र, तुम्ही झोपण्यापूर्वी खात असेलल्या खाद्यपदार्थांचा देखील तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. यासाठी झोपण्यापूर्वी कोणते पदार्थ खाऊ नये, याची माहिती जाणून घेणार आहोत.

डार्क चॉकलेट

अनेकदा आपल्याला झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण फ्रीजमध्ये असलेले चॉकलेट पटकन खाऊन टाकतो. मात्र, असं करू नये. डार्क चॉकलेटमध्ये २५ ते ३८ टक्के कॅफेनचं प्रमाण असतं. कॅफेनचं सेवन केल्यामुळे रात्री झोप लागत नाही. त्यामुळे डार्क चॉकलेट शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी खाऊ नये. यापेक्षा तुम्ही मिल्क चॉकलेट खाऊ शकता.

- Advertisement -

दारूचं सेवन

अनेक अभ्यासांच्या माध्यमातून हे सिद्ध झालंय की, दारूच्या सेवनामुळे काही काळ झोप लागत नाही. दारू ही माणसाच्या झोपेच्या चक्रावर परिणाम करते आणि व्यक्तीला झोप येत नाही. झोपेमुळे तुमच्या डोक्यातील नकारात्मक विचार बाहेर जाण्यास मदत होते. मात्र, दारूच्या सेवनाने नकारात्मक विचार सातत्याने डोक्यात येत राहतात.

मसालेदार पदार्थ

रात्री झोपण्यापूर्वी मसालेदार आणि तिखट पदार्थांचं कधीही सेवन करू नये. प्रथम यामुळे अपचनाचा त्रास होतो ज्यामुळे तुम्ही झोपू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जरी तुम्हाला अपचनाचा त्रास झाला नाही तरीही तुम्हाला रात्री लवकर झोप येणार नाही. याचे कारणं तिखट मसाल्यामध्ये ‘कॅप्सायसिन’ हा घटक असतो. या घटकामुळे तुमच्या शरीराचं तापमानात बदल होऊन तुम्हाला नीट झोप लागत नाही.

कॉफी

- Advertisement -

कॉफीचे चाहते बरेच असतात. काहीजण तर कोणत्याही वेळेला कॉफी पिणं पसंत करतात. मात्र, झोपण्यापूर्वी कधीही कॉफीला हात लावू नये. कारण कॉफीमध्ये बऱ्याच प्रमाणात कॅफेनचं प्रमाण असतं ज्यामुळे झोप लागत नाही. शिवाय रात्रीचं अन्न पचण्यासाठी कॉफीचं सेवन शरीराला योग्य नसतं.

मासांहारी पदार्थ

मासांहारी पदार्थांमुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती असते. शिवाय मासांहारी पदार्थांमध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्याने ते पदार्थ पचण्यासाठी जड जातात. जर मासांहारी पदार्थाचं झोपेच्या काही वेळा अगोदरचं सेवन केलं असेल तर हृदयाच्या ठोक्यांमध्ये फरक पडण्याची शक्यता असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -