घरलाईफस्टाईलकपडे खरेदी करताना....

कपडे खरेदी करताना….

Subscribe

बायका शॉपिंग करायला गेल्या की त्यांना काय घ्यावं आणि काय नाही हे सुचत नाही. कित्येकदा भावनेच्या भरात वाहून त्या आपल्या बजेटपेक्षा जास्त शॉपिंग करतात. मात्र घरी आल्यावर असे वाटते की, यापेक्षा दुसरी चांगली वस्तू घेऊ शकलो असतो. म्हणूनच थोडीशी काळजी घेतली तर खरेदीचा आनंद मिळू शकेल.

ब्रँडेड कपड्यांवर सेल चालू असला तरी घाईघाईत अनफिट कपडे घेऊ नयेत. कित्येकदा कपडे फिटिंगचे घेतले तरी त्यांचा शेप बिघडून जातो. म्हणून कपडे घालून पाहिल्याशिवाय घेऊ नये.

- Advertisement -

भडक रंगाचे कपडे फॅशनमध्ये असले आणि दुसर्‍यांवर ते शोभून दिसत असले तरी ते विकत घेताना याचा विचार करून घ्यावे.ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहेत की नाही याची खात्री करावी. चकचकीत कपडे घेताना आर्कषक वाटत असले तरी ते तुमच्या अंगावर कसे दिसतात ते महत्त्वाचे आहे.

* वेस्टर्न कपडे पहिले कधी घातले नसतील तर ते खरेदी करण्याआधी घालून पाहा. ते तुम्हाला सूट होत असल्यास खरेदी करा.

- Advertisement -

* एखादा पॅटर्न खूप आवडला तरी त्याचे पाच सहा पीस खरेदी करू नका. कारण फॅशन येते तशी फॅशन जायलाही वेळ लागत नाही.

* कोणताही ड्रेस किंवा टी शर्ट खरेदी करताना त्याची किंमत खरंच तेवढी आहे का याची पडताळणी करा. दोन-तीन दुकाने फिरल्याशिवाय पहिल्याच दुकानातून कपडे खरेदी करण्याची घाई करू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -