घरलाईफस्टाईलफळे, भाज्या अशा ठेवा जास्त काळ फ्रेश

फळे, भाज्या अशा ठेवा जास्त काळ फ्रेश

Subscribe

क्वारंटाईनमध्ये भाज्या - फळे जास्त काळ फ्रेश ठेवण्याच्या टिप्स

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सातत्याने बाहेर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक गृहिणी आठ दिवसांची भाजी एकदाच आणतात. मात्र, ती भाजी खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशावेळी काय करावे असा अनेक गृहिणींना प्रश्न पडतो. परंतु, काही टीप्सचा वापर केल्यास भाज्या चांगल्या फ्रेश राहण्यास मदत होते.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या जास्त काळ फ्रेश राहण्यासाठी त्या भाज्यांचे देठ तोडून ठेवावे. यामुळे ती भाजी जास्त काळ फ्रेश राहते.

- Advertisement -

बटाटा

खूप दिवस झाले की बटाट्याला कोंब फुटतात. ते रोखण्यासाठी त्यासोबत एक सफरचंद ठेवावे. यामुळे बटाट्याला कोंब फुटत नाहीत.

कोथिंबीर

- Advertisement -

कोथिंबीर फ्रेश ठेवण्यासाठी पाण्यात धुवून पेपर नॅपकिन किंवा कपड्याने पुसून चांगल्या प्रकारे रॅप करून झिपलॉक बॅगमध्ये बंद करून ठेवावे.

टोमॅटो

टोमॅटो जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याच्या देठाचा भाग खाली ठेवावा आणि खालचा भाग वर ठेवावा. यामुळे टोमॅटो जास्त काळ टिकतात.

स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्यासाठी

स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्यासाठी पाण्यामध्ये व्हिनेगर मिसळून त्यामध्ये स्ट्रॉबेरी धुवावी. यामुळे स्ट्रॉबेरी स्वच्छ आणि फ्रेश होते.

केळी फ्रेश ठेवण्यासाठी

बऱ्याचदा केली काळी पडतात, अशावेळी प्लास्टिक रॅपने त्याचे मूळ रॅप कारावे. यामुळे केळी काली पडणार नाहीत.


हेही वाचा – जाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -