Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावताय का? त्या आधी हे वाचा

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावताय का? त्या आधी हे वाचा

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर वापरत असतो.

Related Story

- Advertisement -

हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडणे, त्वचेला भेगा पडणे यासारखे प्रकार सुरू होतात. हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे मॉइश्चराइज त्वचेला लावत असतो. पण मॉइश्चराइजर लावण्याचेही काही प्रमाण असते. मॉइश्चरायझर लावताना काही गोष्टी कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जाणून घेऊया हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे

  • मॉइश्चरायझर लावताना नेहमी आपल्या त्वचेला सुट होईल असेत मॉइश्चरायझर लावा. तुमची त्वचा तेलकट किंवा कोरडी आहे का हे आधी लक्षात घ्या. त्यानुसार क्रिम मॉइश्चरायझर घ्यायचे की लिक्वीड मॉइश्चरायझर घ्यायचे हे ठरवा.
  • त्वचेवर कधीही मॉइश्चरायझरचा थर लावू नका. त्वचा अधिक प्रमाणात तेलकट असल्यास त्वचेवर मुरूम येऊ शकतात. त्वचेवर नैसर्गिक तेल कमी होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे असे फेशवॉश निवडा की जे फक्त तुमच्या चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करेल तुमच्या चेहऱ्यावरील तेल नाही.
  • कधीही मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. चांगल्या प्रकारचे टोनर चेहऱ्याला लावल्यानंतरच मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावा.
  • मॉइश्चरायझर लावताना फक्त चेहऱ्याला न लावता गळ्याच्या भागातही लावा. जेणेकरून गळ्याची त्वचा कोरडी दिसणार नाही.
  • नारळाचे घटक असलेले मॉइश्चरायझर त्वचेसाठी खूप उपयुक्त असते. त्यामुळे त्वचा मऊ आणि तरूण बनायला मदत होते.
  • ज्यांची त्वचा तेलकट किंवा चेहऱ्यावर पिंपल्स आहेत अशा लोकांनी तेल नसलेले मॉइश्चरायझर वापरणे कधीही उत्तम. चेहऱ्यावर लावण्याचे मॉइश्चरायझर हे वेगळे असते. त्याचप्रमाणे हात आणि पायाला लावण्याचे मॉइश्चरायझर वेगळे असते. आपल्या त्वचेची गरजेप्रमाणे आपल्या मॉइश्चरायझरमध्ये बदल करता येतात.

हेही वाचा – आहार भान – आवळा नवमी

- Advertisement -

 

- Advertisement -