का येते आपल्याला जांभई?

जांभई येणे हे काही आजाराचे किंवा शारीरिक समस्या वाढण्याचे संकेतही असू शकतात

mumbai

बऱ्याचदा घरात किंवा घराबाहेर आपण असताना समोरच्या व्यक्तीने जांभई दिल्याचे पाहिले तर आपल्याला ही नकळत पुढच्या क्षणाला जांभई येते. असे म्हटले जाते की, जांभई ही संसर्गजन्य असते म्हणून समोरच्यास जांभई आली तर आपसुक पाहणाऱ्यास येते. वारंवार जांभई येत असेल तर हे झोपेचे किंवा कंटाळा आल्याचे लक्षण समजले जाते. मिटींगमध्ये किंवा गप्पा मारताना सतत जांभई आल्यास तुमच्याबद्दल समोरच्या माणसाच्या मनात चुकीचा समज निर्माण होतो. परंतु सतत जांभई येणे हे काही आजाराचे किंवा शारीरिक समस्या वाढण्याचे संकेतही असू शकतात. कदाचित हे काही आजाराचे किंवा शारीरिक समस्या वाढण्याचे संकेतही असू शकतात.

का जांभई येते?

 • थकवा किंवा झोपेमुळे
 • झोप पूर्ण न झाल्याने
 • शरीराचे तापमान कमी झाल्याने
 • मेंदूच्या कार्यांमध्ये बिघाड झाल्यास
 • शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्यास
 • लिव्हर निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यावर
 • थकवा नसतानाही जांभई येणे हे हृदय विकाराचे लक्षणही असू शकते.
 • मेंदूचे कार्य मंदावल्यानेही जांभईचे प्रमाण वाढते.

जांभई येऊ नये म्हणून करा हे उपाय

 1. एक-दोन मिनिटांसाठी डोक्यावर थंड पाण्याची पिशवी ठेवा. यामुळे शरीर थंड झाल्याने जांभई येत नाही.
 2. आईस टी किंवा आईस कॉफीदेखील जांभईचे प्रमाण कमी करते.
 3. सतत जांभई येत असल्यास कोणताही विनोदी व्हिडीओ पाहावा. कारण हसणे हे जांभईचे प्रमाण कमी करण्याचा प्रभावी उपाय आहे.
 4. थंड पाणी प्यायल्यानेही जांभई कमी करता येते.
 5. चारचौघात सतत जांभई देणे शक्यतो टाळा.
 6. सतत जांभई येत असेल तर दीर्घ श्वास घ्या.
 7. नाकातून श्वास आत घेऊन तोंडाद्वारे बाहेर टाका. अशाप्रकारे श्वास घेतल्याने जांभईचे प्रमाण कमी होऊन शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.