घरलाईफस्टाईलसौंदर्य खुलवण्यासाठी वापरा खोबरेल तेल

सौंदर्य खुलवण्यासाठी वापरा खोबरेल तेल

Subscribe

खोबरेल तेलाचा जेवणापासून ते औषधापर्यंत सर्व गोष्टींकरता वापर केला जातो. मात्र खोबरेल तेलाचा उपयोग एवढ्यापुरताच मर्यादित नसून त्याचा सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील वापर केला जातो. अशाच काही खास टीप्स ज्याने तुमचे सौंदर्य खुलवण्यास मदत होईल.

मेकअप रिमूव्हर

अनेक तरुणी आणि महिला मेकअप रिमूव्हर म्हणून बाजारामधील महागड्या उत्पादनांचा वापर करतात. ज्यामुळे चेहर्‍याला हानी पोहोचण्याची शक्यता असते. मात्र मेकअप काढण्यासाठी खोबरेल तेलाचा चांगला उपयोग होऊ शकतो. मेकअप रिमूव्हर म्हणून त्याचा वापर केल्याने चेहर्‍याला हानी पोहोचत नाही.

- Advertisement -

त्वचा मुलायम

खोबरेल तेल कोणत्याही त्वचेसाठी वापरले जाते. हात, पाय आणि चेहर्‍याला नियमित तेल लावून मसाज केल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे

डोळ्यांखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

चेहर्‍यावरील पुरळ

चेहर्‍यावर पुरळ आली असल्यास खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेल चेहर्‍याला लावल्याने पुरळ कमी होते.

चेहरा उजळतो

खोबरेल तेलामध्ये समप्रमाणात मध घेऊन त्याचा फेसपॅक तयार करावा. हा फेसपॅक चेहर्‍याला लावल्याने चेहरा उजळतो. हा फेसपॅक ड्राय स्किन असणार्‍यांसाठी जास्त फायदेशीर आहे.

अंगावर लाल चट्टे

अंगावर लाल चट्टे किंवा अंगाला खाज येत असल्यास खोबरेल तेलाचा वापर करावा. यामुळे आराम मिळतो.

स्कीन टोन

खोबरेल तेल अंगाला लावून त्यानंतर थोड्या वेळाने गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -