घरलाईफस्टाईलउन्हाळ्यात कुल राहण्यासाठी ‘गुलकंद’ खा

उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी ‘गुलकंद’ खा

Subscribe

सध्या मुंबईचे तापलेले वातावरण पाहता मुंबईकरांना थंडाव्याची अत्यंत गरज आहे. मात्र, शरीराला थंडावा मिळण्यासाठी अनेकदा आईसक्रीमचे सेवन केले जाते आणि शरीराला थंडावा मिळतो, परंतु ‘गुलकंद’ हा असा पदार्थ आहे की, त्याचे सेवन केल्याने आरोग्यासाठीदेखील फायदा होता. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी ‘गुलकंद’चे दररोज सेवन करा.

 गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केला जाणारा गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र, आरोग्यासाठीही तो तितकाच फायद्याचा आहे. जेवणानंतर गुलकंद खाल्ल्यास पचन उत्तम होण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्यात उद्भवणारे पचनाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते.

- Advertisement -

साखर व गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणारा गुलकंद शरीरात थंडावा निर्माण करून वाढत्या उकाड्यामुळे शरीरातील दाह कमी होतो.

गुलकंदात गुलाबाबरोबरच, साखरही असल्याने शरीराला व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन ई चा पुरवठा होतो.

- Advertisement -

त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब’ फारच हितकारी आहे. गुलाबाचा मंद सुगंध व अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे अनेक फेसपॅक्समध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचा वापर केला जातो.

गुलकंद हे उन्हाळ्यात ऊर्जा देणारे एक उत्तम टॉनिक आहे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थकवा दूर होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -