केसातील कोंड्या घालवण्यासाठी वापरा टोमॅटो ज्यूस

टोमॅटोमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स हे मुबलक प्रमाणात असतात.

Mumbai

टोमॅटोमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असल्याने बऱ्याचदा डॉक्टर टॉमेटो खाण्याचा सल्ला देतात. टोमॅटोमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. टॉमेटोचा वापर हा सलाद किंवा ज्यूसमध्ये केला जातो. टोमॅटो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे आरोग्यदायी टोमॅटो सौंदर्य वाढविण्यासाठीही फायेदशीर तसेच केसांच्या समस्या दूर करण्यासाठी टोमॅटोचा वापर करू शकता. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होऊन केस चमकदार होण्यास मदत होते.

टोमॅटोचा ज्यूस केसांवर लावल्याने होणारे फायदे

  • टोमॅटोचा ज्यूस केसांवर लावल्याने केसांचं टेक्चर सुधारून केस स्मूद होऊन चमकदार होतात.
  • टोमॅटोचा ज्यूस लावल्याने केस मजबुत होऊन केस दुभंगण्याची समस्या दूर होते. त्याचबरोबर केसांची वाढ होते.
  • टोमॅटोचा ज्यूस केसांमध्ये लावल्याने पीएच लेव्हल बॅलेंस होते. ज्यामुळे केसांचा रूक्षपणा नाहिसा होण्यास मदत होते.
  • टोमॅटोचा ज्यूस केसांमधील पीएच बॅलेंन्स करते, ज्यामुळे कोरड्या आणि निस्तेज केसांचा वॉल्युम वाढवण्यासाठी मदत होते.
  • टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतं.
  • टोमॅटोचा ज्यूस केसांना लावल्याने केसांच्या स्काल्पला मजबुती मिळते.