घरलाईफस्टाईलटोमॅटोचे लोणचे

टोमॅटोचे लोणचे

Subscribe

आपण कैरीचे, लिंबाचे, आवळ्याचे असे विविध प्रकारचे लोणचे पाहिले आहेत. मात्र, टोमॅटोचे लोणचे कधी खाल्ले आहे का? हे लोणचे एकदा तयार करुन नक्की याची टेस्ट करा.

साहित्य

१ किलो गावठी टोमॅटो
१ अख्खा लसुण
२ इंच आलं
शेंगदाणा तेल – १ पाव
४ चमचे तिखट
मीठ चवीनुसार

- Advertisement -

कृती

सर्वप्रथम टोमॅटो धुवून, पुसुन चिरुन घ्यावे. त्यानंतर लसुण आल्या पेस्ट करुन घ्यावी. त्यानंतर कढईत तेल तापवून त्यात ही पेस्ट घालून मंद आचेवर गुलाबीसर छान परतवुन घ्यायची. त्यानंतर त्यात चिरलेले टोमॅटो घालून चवी नुसार मीठ घालुन झाकण ठेवून १० मिनिटे शिजू द्यायचे. अधून- मधून परतवून घ्यायचे. १० मी. झालेत की त्यात ४ चमचे तिखट घालयचे आणि छान परतवून घ्यायचे. त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा १० ते १५ मी. शिजू द्यायचे. अशाप्रकारे टोमॅटो छान एकजीव शिजले आणि तेल सुटू लागलं की लोणचे तयार. हे लोणचे १० ते १२ दिवस छान टिकते. तसेच हे लोणचे पोळी, पराठे, पुरी, भात, खिचडी यासोबत देखील खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -