घरलाईफस्टाईलडाएटवर असणाऱ्यांनी 'टोमॅटो साल्सा' खा!

डाएटवर असणाऱ्यांनी ‘टोमॅटो साल्सा’ खा!

Subscribe

'टोमॅटो साल्सा' रेसिपी

अनेकदा ऑफिसवरुन घरी गेल्यानंतर भूक लागते. मात्र, वजन देखील कमी करायचे असते. त्यामुळे कोणतेही जंकफूड देखील खाऊ शकत नाही. अशावेळी जर भूक भागवण्यासाठी आणि वजन वाढू नये, याकरता टोमॅटो साल्सा तुम्ही नक्की ट्राय करु शकता. चला तर जाणून घेऊया टोमॅटो साल्सा कसा तयार करावा.

साहित्य

- Advertisement -

३ बारीक चिरलेले टोमॅटो
अर्धा कप मध्यम कापलेला कांदा
२ चमचे मिरची फ्लेक्स
अर्धा कप कापलेली कोथिंबीर
१ चमचा मीठ
२ चमचे लिंबू रस

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम बारीक चिरलेला कांदा एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर त्यात कांदा, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, मीठ आणि लिंबूरस एकत्र करुन घ्या. हे सार मिश्रण व्यवस्थित एकत्रित करुन घ्या. अशाप्रकारे झटपट टोमॅटो साल्सा तयार. हे खाण्यास तिखट, आंबट आणि चविष्ट लागत. विशेष म्हणजे पापडासोबत टोमॅटो साल्सा खाण्यास अधिकच छान लागतो. यामुळे तुमची भूकही मिटते आणि वजन देखील वाढत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -