घरलाईफस्टाईलहे पदार्थ शरीराबाहेर फेकतात विषारी रसायने

हे पदार्थ शरीराबाहेर फेकतात विषारी रसायने

Subscribe

आहार आणि वातावरणामुळे शरीरात काही असे केमिकल्स प्रवेश करून जातात जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरतात. शरीरातून लिव्हर आणि किडनी ही रसायने बाहेर काढण्यासाठी मदत करतात पण याव्यतिरिक्त या चार पदार्थांचे सेवन केल्यानेदेखील विषारी रसायनांचा प्रभाव नाहीसा केला जाऊ शकतो.

अक्रोड
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स असतात. जे हृदयाला स्वस्थ ठेवत असून डिटॉक्सिफिकेशनचे काम करतं.

- Advertisement -

कोथिंबीर
कोथिंबीर विषारी तत्त्वांना शरीरातील पेशींपासून दूर ठेवते. यासोबत कोथिंबिरीचे सेवन केल्याने लिव्हरला स्वच्छ करणार्‍या एन्झाइम्समध्ये उर्जेचा प्रवाह सुरळीत होतो.

सलगम
अ‍ॅन्टीऑक्सीडेंट्स आणि सल्फरयुक्त सलगम डीटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करणार्‍या एंजाइम्सला सक्रिय करतं.

- Advertisement -

काकडी
काकडीत आढळणारे 95 टक्के पाणी लघवीच्या माध्यमाने विषारी रसायने आणि आम्लीय पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करतं.

फायदे आकारावरून – 

राजमा
राजमा इंग्रजीत किडनी बीन म्हणून ओळखले जाते. राजमाचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर आणि मधुमेहावर नियंत्रण राहतं. एकूण हे किडनीसाठी फायदेशीर आहे.

अक्रोड
अक्रोड दिसण्यात मेंदू सारखं असतं. मेंदूत 60 टक्के फॅट असतात. म्हणून अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स मेंदूसाठी उत्तम आहार आहे.

गाजर
गाजराचे स्लाइस केले की ते डोळ्यासारखे दिसतात. गाजर अ जीवनसत्त्व युक्त असल्याने हे डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. भरपूर गाजर खाणार्‍यांना मोतीबिंदू आणि मंद दृष्टीची भीती नसते.

टोमॅटो
टोमॅटोमध्ये मनुष्याच्या हृदयासारखे चार चेंबर असतात. यात असलेले विटामिन्स रक्त शुद्ध करून हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करतात.

#MeToo नाना पाटेकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -