घरलाईफस्टाईलट्रेकचा आरोग्‍यदायी मार्ग

ट्रेकचा आरोग्‍यदायी मार्ग

Subscribe

पावसाळ्या दरम्‍यान ट्रेकिंग सोबत आरोग्य देखील सांभाळा

पावसाळ्यामध्‍ये रोज बाहेर चालायला जाणे आव्‍हानात्‍मक असेल तर ट्रेकिंगला जाण्‍याची योजना आखा. पावसाळ्या दरम्‍यान ट्रेकिंग उत्‍तमच असते. उंच डोंगर, शिखरावर चढताना ऑक्सिजनची कमी पातळी आणि सतत बदलणारे तापमान यांचा सामना करावा लागतो. आपल्‍यापैकी बहुतेकांना डोंगराळ भागांमधील हवामानाची सवय नसते. ज्‍यामुळे ट्रेकिंग अधिकच आव्‍हानात्‍मक होऊन जाते. पण सेवन केला जाणारा आहार आणि पोषणामध्‍ये समायोजन केले तर हे ट्रेकिंग ‘फारसे अवघड’ ठरणार नाही.

तुम्‍ही काय खावे आणि काय खावू नयेत हे सांगण्‍यापूर्वी आपणा सर्वांसाठी हे जाणून घेणे महत्‍त्‍वाचे आहे की, आपला आहार कसाही असो ट्रेकसाठी सामान मर्यादित असले पाहिजे. बॅगच्‍या वजनाचा तुमच्‍या पोश्‍चरवर परिणाम होतो, ज्‍यामुळे ट्रेकदरम्‍यान अधिक नुकसान होऊ शकते. तुमच्‍या पाठीच्‍या कण्‍याला दुखापत झाली. तर ट्रेक विसरूनच जा. सकाळचे लवकर उठणे देखील अवघड होऊन जाईल. ट्रेकचा कालावधी पंधरवड्यापेक्षा कमी असेल तर ४० ते ५० लिटर बॅकपॅक (आकारमानासंदर्भात) सोबत ठेवा. सामान्‍यत: ५० लिटर बॅकपॅक आवश्‍यक सामान व स्‍लीपींग बॅग घेऊन जाण्‍यासाठी पुरेसे आहे. बॅकपॅकचे वजन जवळपास ९ ते १० किलो असेल तर उत्‍तमच, पण ट्रेकचा कालावधी सामान्‍य कालावधीपेक्षा अधिक असेल तर ते वजन १२ किलोच्या खाली ठेवण्‍याचा प्रयत्‍न करा.

- Advertisement -

ट्रेकदरम्‍यान कशी काळजी घ्यावी

आरोग्‍यदायी पौष्टिक ब्रेकफास्‍टसह दिवसाची सुरूवात करा. तुमच्‍या हायकिंग ट्रिपची सुरूवात करण्‍यासाठी पौष्टिक ब्रेकफास्‍ट सेवन करणे अत्‍यंत महत्‍त्‍वाचे आहे. यामुळे तुम्‍हाला स्‍वस्‍थ वाटून ऊर्जा मिळवण्‍यामध्‍ये देखील मदत होईल. आरोग्‍यदायी ब्रेकफास्‍टमध्‍ये उपमा, पोहा, इडली, डोसा, रोल ओट्ससह दूध किंवा दही, काजूंसह दूधामध्‍ये ग्रॅनोला यांचा समावेश करता येतो. आजकाल मॉडर्न रिटेल आणि ईकॉमर्समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या क्विनोआ आणि मिलेट्सपासून बनवण्‍यात आलेले उपमा व पोह्याचे आरोग्‍यदायी व्‍हर्जन देखील उपलब्‍ध आहेत.

प्रवासादरम्‍यान ऊर्जा देणारे वजनाने हलके, परिपूर्ण व पौष्टिक जेवण सोबत ठेवा

शिखरांवर स्‍टोअर्स नसल्‍यामुळे सोबत खाण्‍याचे पदार्थ असणे उत्‍तम. जे पोर्टेबल, सोईस्‍कर असण्‍यासह अधिक भार न देता तुम्‍हाला मुबलक प्रमाणात ऊर्जा देतात. तुम्‍ही जसजसे डोंगरावर चढत जाता, तसतसे ही शक्‍यता कमी होऊ लागते. म्‍हणून तुम्‍ही पदार्थ योग्‍यरित्‍या पॅक करुन घेत त्‍यामध्‍ये साध्‍या व पौष्टिक पदार्थांचा समावेश असला पाहिजे. सूप्‍स आणि हेल्‍थ शेक्‍स योग्‍य ठरू शकतात आणि ते बनवण्‍यासाठी कमी वेळ लागतो. तसेच ते सहजपणे वाहून नेता येतात. पण नेहमीच्‍या इन्‍स्‍टण्‍ट सूप्‍सपेक्षा हाय प्रोटीन सूप्‍स आणि मील रिप्‍लेसमेंट शेक्‍सचा अवलंब करावा. यामध्‍ये मोरिंगा, क्विनोआ, बकव्हीट, अमरंथ आणि हळद यांसारखे घटक असतात. हे घटक सामान्‍यत: सुपर फूड मानले जातात. त्‍यामध्‍ये पौष्टिक घटक व जीवनसत्‍त्‍वे मोठ्या प्रमाणात असतात. जे शरीरासाठी आणि लांबचे अंतर चढण्‍यासाठी आवश्‍यक असतात. तसेच हे पदार्थ ठेवण्‍यासाठी जागा देखील कमी लागते. तुम्‍ही उंचावर जाता तसतसे वातावरण थंड होते, अशावेळी सूप्‍स तुम्‍हाला उबदार ठेवण्‍यामध्‍ये मदत करतात. फक्‍त हे सूप्‍स गरम पाण्‍यात करण्‍याची गरज आहे, असे सूप्‍स ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म्‍स व रिटेल स्‍टोअर्समध्‍ये मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध आहेत.

- Advertisement -

साखर टाळा

घसा खवखवणे किंवा निर्जलीकरण अशा समस्‍या टाळण्‍यासाठी ट्रेक सुरू करण्‍यापूर्वी साखरेचे सेवन टाळा. मानवी शरीरासाठी साखर गरजेची आहे, पण आपल्‍यापैकी अनेकजण नकळतपणे प्रमाणाबाहेर साखरेचे सेवन करतात. यामुळे हृदयावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात आणि उंच भागांवर हे टाळले पाहिजे.

किमान ४ लिटर्स पाणी प्‍या

उंचावर ऑक्सिजन पातळी कमी होत जाते आणि पाण्‍यात असलेले ऑक्सिजनचे प्रमाण काही प्रमाणात दिलासा देऊ शकते. तसेच पाण्‍यामुळे स्‍नायूमध्‍ये येणारे पेटके देखील कमी होऊ शकतात. जे सामान्‍यत: पहिल्‍यांदा ट्रेकिंग करणाऱ्या ट्रेकर्समध्‍ये येतात. ४ लिटर्स पाण्‍यामुळे तुमच्‍या बॅगेचे वजन लक्षणीयरित्‍या वाढू शकते. म्‍हणून शिखरावर चढताना काळजी घ्‍या आणि ट्रेकिंगसाठी काळजीपूर्वक पॅकिंग करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -