नक्की ट्राय करा गुजराती समोसा

shimla soap cake found in samosa of igmc canteen
समोसा

अनेकदा पावसाच्या वातावरणात वडा पाव, भजी, समोसा असं चमचमीत पदार्थ खावेसे वाटतं असतं. अशा वेळी तुम्ही हा गुजराती समोसा घरी नक्की करू पाहा.

साहित्य

भिजवलेले पोहे एक कप, बटाटे, मिक्स भाज्या, फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर, बीन्स, एक टेबलस्पून तीळ, मोहरी, हिंग, धने-जिरेपूड, आलं, हिरवी मिरची वाटून, साखर, मीठ, लिंबाचा रस, तिखट.

कृती

सर्वप्रथम भांड्यात तेल घालून त्यात आलं आणि मिरची, तीळ याची फोडणा द्या. वाफवलेल्या भाज्या घाला. त्यानंतर पोहे घाला. थोड्यावेळानंतर त्यामध्ये धने-जिरेपूड, साखर, मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर घाला.
हे झाल्यानंतर मैदा दोन कप, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, त्यात अंदाजाने तूप घालून घट्ट भिजवा. त्यानंतर त्यात बनवलेले सारण घालून समोसे तळावे. हा झाला गुजराती समोसा.