घरलाईफस्टाईलट्राय करा झटपट चविष्ट रेसिपी

ट्राय करा झटपट चविष्ट रेसिपी

Subscribe

पावसाळ्यात रोजच्या जेवणा व्यतिरिक्त वेगळं खाण्याची प्रत्येकाचीच इच्छा होतेय, मग या रेसिपी नक्की करा

पावसाळा आला की, खूप काही वेगवेगळे पदार्थ करुन खावेसे वाटतात. सध्या बेधुंद असा पाऊस बरसत आहे. अशा मस्त वातावरणात गरमागरम आणि स्पायसी पदार्थ खायला खूप मज्जा येते. या पावसाळ्यात रोजच्या जेवणा व्यतिरिक्त वेगळं खाण्याची प्रत्येकाचीच इच्छा होत असते. यासाठी नक्की ट्राय करून पहा, आजच्या चविष्ट रेसिपी

दौडी फुलाची भाजी

- Advertisement -

साहित्य

दौडी फुलाचा घोस १० ते १२, लसूण पाकळ्या ४ ते ५, हिरव्या मिरच्या ४ ते ५, शेंगदाणे अर्धी वाटी, १ चमचा जिरे, १ चमचा मोहरी, फोडणीसाठी तेल २ चमचे, चवीपुरते मीठ, चिमूटभर हळद, अर्धा चमचा साखर आणि काळा मसाला, कोथिंबीर.

- Advertisement -

कृती

  • सर्वप्रथम दौडीची भाजी निवडून स्वच्छ धुऊन घ्या.
  • नंतर शेंगदाणे भाजून घ्यावे. हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात आणि त्यानंतर जिरे, लसूण, शेंगदाणे घालून वाटण करावे.
  • गॅसवर तेलात जिरे, मोहरीची फोडणी द्या. जिरे, मोहरी तडतडल्यावर भाजी, हळद घाला. त्यानंतर २ ते ३ मिनिटे वाफा मंद आचेवर येऊ द्या.
  • त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचे केलेले वाटण, मीठ, साखर, कोथिंबीर घाला. ५ मिनिटे शिजू द्या.
  • ही दौडाची फुलाची भाजी भाकरी किंवा पोळीसोबत खा.

आलू चाट

साहित्य

हिरवी कोथिंबीर, हिरवी मिरची, काळ मिठ, लिंबूचा रस, गरम पाण्यातून वाफवलेले बटाटे, जिरा पावडर, चाट मसाला, लाल मिरची पावडर, कांदा, चिंचेचा रस आणि तेल

कृती

  • पहिल्यांदा आलू चाटला लागणारी हिरवी चटणी बनवायची. हिरवी कोथिंबीरमध्ये हिरवी मिरची, काळ मीठ घालून वाटण करुन घ्यावे.यानंतर गरम पाण्यात वाफवलेले बटाटे तेलामध्ये तळून घ्यावे.
  • बटाट्यांना लालसर होई पर्यंत तेळावेत. मग एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. त्या तेळलेल्या बटाट्यांमध्ये काळे मीठ, जिरा पावडर, चाट मसाला आणि लाल मिरची पावडर टाकावी.
  • नंतर त्यामध्ये कापलेला कांदा आणि अर्धा लिंबूचा रस टाकावा. मग बनवलेली हिरवी चटणी आणि लिंबूचा रस त्यामध्ये टाकावा. हे सर्व टाकून झाल्यानंतर सगळ्या गोष्टींना व्यवस्थित मिक्स करावे.
  • मग पुन्हा एकदा सर्व मिश्रण बाऊलमध्ये काढून घ्यावे आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकावा. आलू चाटची रिसेपी खाण्यास तयार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -