घरलाईफस्टाईलशेंगदाण्याची पोळी

शेंगदाण्याची पोळी

Subscribe

आपण नेहमी शेंगदाणे हे कोणत्याना कोणत्या भाजीत टाकत असतो. याच शेंगदाण्याची आज तुम्हाला पोळी कशी तयार करतात हे सांगणार आहोत. ही पोळी तुम्ही सहजरित्या करू शकता.

साहित्य

दोन वाटी शेंगदाणे, एक ते दीड वाटी गूळ, तेल किंवा तूप, वेलची पावडर आणि पुरणपोळीसाठी जशी कणीक मळून घेता तशीच कणीक मळावी.

कृती

  • शेंगदाणे निवडून घ्यावेत. मग ते शेंगदाणे भाजून घ्यावेत. त्यानंतर ते भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची साल काढावीत.
  • साल काढलेल्या शेंगदाण्याचा मिक्सरमध्ये बारीक कूट करून घ्या.
  • नंतर गूळ देखील मिक्सरला बारीक करा.
  • शेंगदाण्याचा कूट आणि गूळ एकजीव करा. मग त्यामध्ये वेलची पावडर घाला.
  • त्यानंतर मळून घेतलेल्या कणीकमध्ये कूट आणि गूळाचे मिश्रण घाला. आता पोळपाटोवर त्याचा गोळा करून तो लाटण्याने हलकेच त्याची पोळी लाटा.
  • मध्यम आचेवर तवा तापवून त्यावर तेल किंवा तूर लावून ती पोळी भाजून घ्या. ही झाली शेंगदाण्याची पोळी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -