घरलाईफस्टाईलअपचनावर 'वेलची' एक रामबाण उपाय

अपचनावर ‘वेलची’ एक रामबाण उपाय

Subscribe

छोटी वेलची फायदे अनेक देई

वेलची ही नेहमी पदार्थांचा सुगंध आणि स्वाद वाढवण्यासाठी वापरतात. खास करुन अनेक गोड पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केला जातो. तसेच मुखशुध्दी म्हणूनही वेलची वापरतात. ही वेलची दिसायला जरी छोटीशी असली तरी गुणांनी खूप मोठी आहे. विलेचीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, रायबोफ्लोविन सोबतच विटामिन सी आणि खनिजे असतात. त्यामुळे अन्नपचनाची प्रक्रिया सुरळीत होते. त्यामुळे अपचनावर वेलची एक रामबाण उपाय आहे.

पोट साफ होण्यास मदत

अनेकदा जेवणाच्या वेळा या ठरलेल्या नसतात. त्यामुळे बऱ्याच जणांना अपचनाचा त्रास होतो. अशावेळी वेलचीचे आवर्जुन सेवन करा. जेवण झाल्यावर थोडीशी वेलची चघळावी. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तसेच अपचनाचा त्रास दूर होतोच. त्याचबरोबर जळजळही थांबते.

- Advertisement -

भूक चांगली लागते

बऱ्याचदा अपचनाचा त्रास होत असल्याने भूक मंदावते. अशावेळी अधूनमधून वेलचीचे काही दाणे तोंडात टाकल्यास चांगली भूक लागण्यास मदत होते.

कफ दूर होतो

हिवाळ्याच्या दिवसात बदलणाऱ्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि छातीत होणार कफ याचे प्रमाण अधिक असते. यावर वेलची एक रामबाण उपाय आहे. वेलचीचे सेवन केल्यास कफ दूर होतो.

- Advertisement -

श्वसनासंबंधीचे आजार

दररोज एक वेलची खालल्यामुळे श्वसनासंबंधीचे आजार दूर होण्यास मदत होते.

दातांच्या समस्येवर उपयुक्त

वेलची दातांच्या समस्येवर उपयुक्त असते. अनेक माऊथ फ्रेशनर्स आणि टुथपेस्टमध्येही वेलचीचा समावेश असतो. जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गांशी सामना करण्यासाठी वेलची एक उत्तम औषध म्हणून काम करते. तोंडाला होणारे अल्सर आणि घशाच्या संसर्गांवर वेलचीचे पाणी पिणे उपयुक्त ठरते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -