पेट्रोलिअम जेलीचा असाही वापर

Mumbai
पेट्रोलिअम जेली

थंडीच्या दिवसात रुक्ष त्वचेला कोमल करण्यासाठी पेट्रोलिअम जेलीचा वापर केला जातो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की या पेट्रोलियम जेलीचा वापर अन्य कारणांसाठीही करता येतो. तर जाणून घेऊयात पेट्रोलियम जेलीचे इतर फायदे.

टाचांच्या भेगांपासून सुटका – थंडीच्या दिवसांमध्ये तसेच सतत पाण्यात काम केल्याने टाचांना भेगा पडून टाचा रुक्ष होतात. अशावेळी स्वच्छ पाण्याने पाय धुवावेत त्यानंतर टॉवेलच्या साहाय्याने पाय कोरडे करून त्यानंतर टाचांना पेट्रोलियम जेली लावावी. काही दिवसांनी टाचा मुलायम होतात.

पाळीव प्राण्यांच्या पंजांसाठी – घरातील पाळीव प्राण्यांच्या पंजांची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा उपयोग होऊ शकतो. पाळीव प्राण्यांचे पंजे कापसाने स्वच्छ कोरडे करून त्यानंतर पेट्रोलियम जेली लावा.

डायपरचे पुरळ घालवा – सतत डायपर घातल्याने लहान बाळांच्या त्वचेला पुरळ येतात. त्यामुळे लहान बाळाची आंघोळ होताच त्याची त्वचा टॉवेलने कोरडी करा. त्यानंतर बाळाच्या त्वचेला पेट्रोलियम जेली लावा. खूपच पुरळ असल्याचं बालरोगतज्ज्ञांकडे जावे.

डोळ्यांचा मेकअप काढा – डोळ्यासारख्या नाजूक अवयवाचा मेकअप उतरवताना काळजी घ्यावी लागते. त्यामुळे कॉटनच्या बोळ्यावर पेट्रोलियम जेली घेऊन अलगद डोळ्यांचा मेकअप काढा.

चमकदार केसांसाठी – धूळ, सूर्यकिरणे तसेच तरणतलावातील पाण्यामुळे केस रुक्ष होतात. त्यामुळे केस स्वच्छ धुतल्यानंतर हातावर थोड्या प्रमाणात पेट्रोलियम जेली घेऊन ती केसांना लावावी. केस चमकदार होऊन, रेशमी दिसतात.

पर्फ्युमचा सुगंध टिकवा – पर्फ्युमचा वापर करण्याआधी पेट्रोलियम जेली लावल्यास पर्फ्युमचा सुगंध खूप वेळ टिकतो.

हेअरडाय, नेलपॉलिश पासून त्वचा सांभाळा – केसांना हेअर डाय लावताना किंवा नखांना नेलपॉलिश लावताना रंग त्वचेला लागून त्वचा खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी डोक्याभोवती किंवा नखांभोवती पेट्रोलियम जेली लावल्यास त्वचेवरील रंग काढण्यास मदत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here