घरलाईफस्टाईलसाडीचा कल्पक वापर

साडीचा कल्पक वापर

Subscribe

साडी हा समस्त महिला वर्गाचा आवडता पेहराव. साडी मग ती आई, ताई, आजी यापैकी कोणीही दिलेली असो आपण ती आठवण म्हणून सांभाळून ठेवतो. अनेक प्रसंगांना साडी नेसून झाल्यावर, कालांतराने ती अडगळीत पडते. मग कधीकाळी कपाट आवरताना अशा साड्या आपल्या निदर्शनास पडतात. साड्यांचे आकर्षक रंग आणि डिझाईन यामुळे त्या अशाच टाकून देणे आपल्या जीवावर येते. अशावेळी हातात सुई धागा घेऊन आपण त्या साड्यांचा कल्पक वापर करू शकतो. त्यामुळे आपल्या आठवणीसुद्धा जपल्या जातील तसेच घराला हटके लूकसुद्धा मिळेल.

गोधडी – निरुपयोगी साड्यांपासून गोधडी शिवणे हे प्रत्येक आई आणि आजीचे आवडते काम. आई, आजीने साड्यांपासून शिवलेल्या गोधडीत जी मायेची उब आपल्याला मिळते, त्याची सर ब्रँडेड रजई, चादरीना नाही. साड्यांचा यापेक्षा कल्पक वापर होऊ शकत नाही. विविध रंगांच्या, नक्षीकामाच्या साड्यांची योग्य रचना करून सुंदर पॅचवर्क तयार करता येते. या पॅचवर्कला हातशिलाई घालून किंवा मशीनवर सुद्धा शिलाई घालून सुंदर गोधडी तयार करता येते.

- Advertisement -

उशीचे कव्हर – घरातील उशांचे कव्हर्स काही काळाने खराब होतात. त्यामुळे सुती किंवा मलमलच्या साड्यांपासून उशीसाठी आकर्षक कव्हर्स बनवता येतात. साडीचे अशांच्या आकाराचे कापड घेऊन हातशिलाई घालून कव्हर बनवावे. या कव्हर्सना बाजूने लेस लावल्यास कव्हर्स अधिक सुंदर दिसतात.

पडदे – आपल्या घरातील खिडक्यांच्या आकाराचे साडीच्या सहाय्याने पडदे शिवता येतात. खिडक्या मोठ्या असल्यास दोन ते तीन प्रकारच्या, रंगांच्या साड्यांचा वापर करता येतो. अशावेळी एका साडीपासून दोन पडदे तयार करून, आणखीन एका साडीपासून दुसरा पडदा शिवून घ्यावा. पडद्यांमधील विविध रंगसंगतीमुळे खिडक्यांना सुंदर लूक येतो.

- Advertisement -

पायपुसणी – प्रत्येकीच्या साठवणीत एक तरी सुती साडी असतेच. या सुती साड्यांपासून पायपुसणी तयार करून तिला गडद रंगाची लेस लावावी. सुंदर अशी पायपुसणी तयार होईल.

अ‍ॅप्रन, मिक्सरला कव्हर – सुती साड्यांचा आणखी एक उपयोग असा की त्यापासून आपण अ‍ॅप्रन तसेच मिक्सरला कव्हर बनवू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -