घरलाईफस्टाईलयोग जुळवा आणि रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह पळवा !

योग जुळवा आणि रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह पळवा !

Subscribe

नियमित योग आणि शारीरिक व्यायाम ही दीर्घायुष्य आणि निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. योगामुळे स्नायू, हाडे, हृदय आणि श्वसनविषयक अवयव तंदुरुस्त राहण्यास मदत होते. तसेच मानसिक आरोग्य चांगले राहून डिप्रेशनसारख्या आजारावर मात करता येते. योग जुळवा म्हणजे आवर्जुन योग करा आणि शारीरिक तसेच मानसिक आजार पळवा, हा विचार आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय योग दिनी लक्षात घेण्याची गरज आहे. असंसर्गजन्य रोग जसे, उच्च रक्तदाब, पक्षघात, हृदयविकाराचा झटका, मधुमेह यांसारख्या रोगांमुळे शरीराला निर्माण होणारा धोका योग केल्यामुळे कमी होतो. हे रोग दरवर्षी दक्षिण-पूर्व आशियातील ८५ लाख लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने शारीरिक व्यायामाबाबत २०१८ ते २०३० सालापर्यंतच्या तयार केलेल्या जागतिक कृती आराखड्यात योगाला विशेष महत्त्व दिलेले आहे. ५००० वर्षांपूर्वीपासून प्रचलित असलेला योग व्यायामाला जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. ५-१५ वयोगटातील मुलांनी दिवसाला कमीतकमी ६० मिनिटे मध्यम ते तीव्र स्वरुपाचा व्यायाम करणे आवश्यक आहे. तर पौढ व्यक्तींना आठवड्याला १५० मिनिटांचा व्यायाम आवश्यक आहे.दक्षिण पूर्व आशियातील सदस्य राष्ट्रांनी असंसर्गजन्य रोगांमुळे अकस्मात होणाèया मृत्युंचे प्रमाण २०२५ सालापर्यंत २५ टक्क्यांनी तर २०३० सालापर्यंत ३५ टक्क्यांनी कमी करण्याचा संकल्प केला आहे. त्यात योग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. योगाला प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त लोकांना निरोगी करण्याचे कार्य हे सदस्य देश करणार आहेत.

- Advertisement -

खुली व्यायाम शाळा, सायकल ट्रक, रनिंग ट्रक, योग शाळा अशा माध्यमातून शारीरिक व्यायाम वाढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचबरोबर शहरी लोकांच्या अश्रम जीवनशैलीतही बदल करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांमध्ये एकमत झालेले आहे. मुलांमध्ये शारीरिक व्यायाम वाढवण्यासाठी शाळा महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये व्यायामाची लागलेली आवड भावी जीवनात निरोगी जीवन जगण्यास उपयुक्तठरते.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नियमित व्यायामाचे महत्त्व आपल्या जीवनात अधोरेखित होत आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी योग हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सर्वात चांगले माध्यम आहे.

 

- Advertisement -

डॉ. पूनम क्षेत्रपाल सिंग
जागतिक आरोग्य संघटना,
(दक्षिण-पूर्व आशियाचे विभागीय संचालक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -