कॉलेजच्या दिवसात ‘या’ टुल्सचा वापर करा

कॉलेजच्या दिवसात आपण गॅझेटचा वापर हा सर्वात जास्त करत असतो. आजकाल विद्यार्थी हा गॅझेटशिवाय दिसतं नाही. लॅपटॉप, टॅब, आयपॅड यासारख्या गॅझेटचा वापर करून विद्यार्थी आपल्या अभ्यास करत असतात. म्हणून हे गॅझेट दीर्घकाळ आणि सुरक्षित राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत असतो. तुम्हाला या गॅझेट व्यतिरिक्त उपयुक्त पडतील असे इतर गॅझेट बद्दल आज सांगणार आहोत.

फिटनेस ट्रॅकर

फिटनेस ट्रॅकर हे आपल्या फिटनेस संबंधिच्या बाबी ट्रॅक करत असतं. हे सध्या खूप महत्त्वाचे आहे. आपण कॉलेजला जात असताना किंवा व्यायाम, खेळ खेळत असताना हे फिटनेस ट्रॅकर शरिरातील बदलाची माहिती वेळोवेळी देत असतं. यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये फिटनेस ट्रॅकर हा अॅप डाऊनलोड करावा लागतो. तसेच आता या फिटनेस ट्रॅकरवर आपल्या मोबाईलवर येणारे कॉल आणि मेसेस देखील दाखवतं.

लॅपटॉप लॉक

कामा निमित्ताने विद्यार्थ्यांना लॅपटॉप सतत बाळगावा लागतो. लॅपटॉप बरोबर लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित राहणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. लॅपटॉपवर काम करत असताना आपल्या ध्यानात येत नाही आपण चुकीच्या संकेतस्थळावर गेलो तर सायबर गुन्हेगार त्याचा फायदा उचलू शकतात. अशा वेळी सिक्रेट कोडचा वापर करून डेटा सुरक्षित ठेऊ शकतो. तसेच सिक्यूरिटी केबलचाही उपयोग करू शकतो.

व्हॅक्‍यूम ट्रॅव्हल मग

चहा, कॉफी, ज्यूस पिण्यासाठी प्रवासात व्हॅक्‍यूम ट्रॅव्हल मग हा खूप उपयुक्त आहे. तो हाताळ्यासाठी अत्यंत सोपा आहे. त्याचा वापर एका हाताने करता येतो. हा मग पातळ पदार्थ स्थिर ठेवण्यासाठी मदत करतो. तसेच या मगात कोणताही पातळ पदार्थ थंड किंवा गरम ठेवण्याचे काम करतो. हा मग सीलबंद आणि रबरची ग्रीप असलेल्यामुळे प्रवासातील आदर्श मग मानता येईल.