घरलाईफस्टाईलजाणून घ्या, व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?

जाणून घ्या, व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?

Subscribe

व्हेरिकोज व्हेन्सचे दुखणे

व्हेरिकोज व्हेन्स हा पायांना होणारा आजार आहे. हा आजार म्हणजे शिरांची एकप्रकारची पिळवणूक असून, त्यामुळे त्यांची लवचिकता हळूहळू कमी होऊन अंतिम टप्प्यात नष्ट होते. शिरांमधील व्हॉल्व्ह मागील बाजूनं काम करणं कमी करतात, म्हणजे तिथला रक्तप्रवाह खंडीत होतो. या व्हेन्स कालांतराने मोठ्या आणि वेड्यावाकड्या दिसू लागतात आणि त्यांना व्हेरीकोज, असे म्हटले जाते.

व्हेरीकोज व्हेन्स होण्याची कारणे

सातत्याने जास्त काळ उभे राहणे हे व्हेरीकोज व्हेन्सचे सर्वात महत्त्वाचे कारण असते. रक्‍तवाहिन्यांमधील झडपांमध्ये दोष उत्पन्‍न होणे हे मुख्य कारण असते. व्हॉल्व्हमधील दोष, जन्मतःच्या विकृती, रक्‍तवाहिन्यातील रक्‍ताची गुठळी अथवा रक्‍तवाहिनीला सूज येणे यामुळे प्रामुख्याने उत्पन्‍न होत असतात. अशुद्ध रक्‍तवाहिनीत दोष उत्पन्‍न झाल्यास ज्या रक्‍तवाहिनीतून ती त्यामध्ये अशुद्ध रक्‍त येत असते ती शिरा फुगून राहू लागते.

- Advertisement -

वाढते वय

जसेजसे वय वाढू लागते चाळीशी नंतर रक्तवाहिन्या लवचिकता गमावू लागलात व वाॅल्व्ह कमकुवत होऊ लागतात त्यामुळे ४०-५० वायोवर्ष गटातील ४०% पेक्षा अधिक लोकांमध्ये हा आजार दिसून येतो.

गर्भवती महिला

गर्भधारणे दरम्यान, आपल्या हार्मोन्स मधील बदल, पोटातील बाळाच्या वाढीसाठी रक्त संक्रमणात होणारी वाढ याचा एक दुष्परिणाम म्हणजे वेरीकोज वेन्स

- Advertisement -

लठ्ठपणा

अतिरिक्त वजन आपल्या रक्तवाहिन्यांवर अधिक दाब निर्माण करतात.

जास्त काळ उभे राहणे

जास्त काळ एकाच स्थितीमध्ये उभे राहिल्यास रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही. अतिप्रमाणात वाढलेल्या वेरीकोज वेन्सचे योग्य वेळी उपचार न झाल्यास खराब झालेली वेन फुटून त्यातून रक्तस्राव होऊ शकतो अथवा त्याचे रुपांतर बर न होणाऱ्या जखमेत होऊ शकत.

लक्षणं

-पाय कुरूप दिसण्यास सुरुवात
-पायाला जडत्त्व येणं. सतत दुखणं.
-घोटा आणि तळपायाला सूज
-खाज आणि घोट्याजवळील त्वचेचा रंग नाहीसा होणं
-पायात चमक भरणं, मुंग्या येणं
-थ्रोम्बोफ्लेबिटिस : म्हणजे सुजलेल्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणं
-व्हेरिकोज एक्झिमा किंवा डरमॅटिटिज : त्वचा कोरडी बनते. सतत खाज सुटते. सतत त्वचा नखानं खाजवल्यानं तिथं जखम होते, रक्त येतं आणि या वेदना सहन होत नाहीत. हे व्रण जात नाहीत. थकवाही खूप जाणवतो.
– लिपोडरमॅटोस्केरोसिस : यामध्ये त्वचा रूक्ष, कडक बनते.

व्हेरीकोज व्हेन्समुळे कोणते त्रास होऊ शकतात?

–    रक्तवाहिन्या मोठ्या व वेड्यावाकड्या दिसणे.
–    जास्त वेळ उभे राहिल्यास पायाच्या पोट-या व घोट्याला सुज येणे, दुखणे.
–    पुढे जाऊन घोट्याजवळची त्वचा काळसर होणे, खाज येणे व जखमा होणे.
–    व्हेन्समधून रक्तस्राव होणे.
–    व्हेन्समधील रक्त साकळणे – हे रुग्णांसाठी जीवघेणे ठरू शकते.

हा आजार होऊ नये म्हणून उपाय

तुमच्या पायाला सूज येत असल्यास रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आठवणीने स्टॉकींग्स घाला. जर तुम्हाला वेरीकोस वेन्सची समस्या असेल तर त्यामुळे कोलेजीन पेशी कमजोर आणि लवचिक होतात. ज्यामुळे लवकर जखमा होणे अथवा त्यातून रक्त येण्याची शक्यता असते. यासाठी तुमच्या शरीराचा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी प्रयत्नशील रहा. जर तुमचा डेस्क जॉब असेल, तुम्ही जर सतत विमानानेे प्रवास करीत असाल किंवा तुम्ही उभे राहून काम करीत असाल तर तुम्ही पायात स्टॉकींग्स वापरणे गरजेचे आहे.

–    नियमित व्यायाम करा त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुधारेल आणि तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील. कारण जर तुमचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर पायावर त्याचा दाब येऊन ही समस्या अधिकच वाढू शकते.

–    चालताना पायावर कमी दाब येण्यासाठी फ्लॅट अथवा कमी हिल्सचे शूज वापरा. त्याचप्रमाणे उंच टाचाचे शूज वापरणे जाणिवपूर्वक टाळा कारण त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो.

उपचारपद्धती

क्मप्रेशन स्टॉकींग आणि व्यायाम

वेरोकोज वेन्सची सुरुवात झालेली असताना या उपचारपद्धतीने खूप फायदा होतो. दुखणे तर कमी होतेच त्याबरोबर आजार अजून दुर्धर होण्यापासून प्रतिबंध होतो यासोबतच रोज नियमित ३० मिनिटे चालवे आणि अतिरिक्त वजन उचलणे टाळावे.

शस्त्रक्रिया

ही जुनी उपचारपद्धती असून यात परंपरागत पद्धतीने खराब रक्त वाहिन्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात येतात. यात कमरेखालील भागात भूल देण्यात येते आणि रुग्णाला कमीत कमी एक दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागते.

EVLT लेजर उपचारपद्धती

यात सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने खराब झालेल्या रक्त वाहिन्या शोधून त्यावर अत्याधुनिक लेजर मशीनच्या सहाय्याने लेजर किरणांचा मारा केला जातो. आज जगामधली सर्वात अत्याधुनिक आणि लोकप्रिय अशी ही उपचारपद्धती आहे. यात रुग्णाला पूर्ण भूल देण्याची गरज नसते.


–    डॉ आशिष धाडस, जनरल सर्जन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -