घरलाईफस्टाईलतुमच्याही केसांमध्ये होतो 'गुंता'

तुमच्याही केसांमध्ये होतो ‘गुंता’

Subscribe

केसांचा गुंता असा करा सहज दूर

केसांमध्ये गुंता होणे ही एक सामान्य समस्या आहे. पण, बऱ्याचदा प्रवास, प्रदूषण यामुळे केसांचा गुंता होतो. तर ज्या व्यक्तींचे केस कुरळे असतात, त्यांच्या केसांचा अधिक गुंता होतो. विशेष म्हणजे हा गुंता सहज मोकळा करता येत नाही. कारण केस मोकळे करताना बऱ्याचदा तुटतात आणि गळतातही. अशावेळी काय करावे ते आज आपण पाहणार आहोत.

केसांना धुळीपासून दूर ठेवा

- Advertisement -

बऱ्याचदा आपण प्रवासात असताना केस मोकळे ठेवतो. त्यामुळे हवेतील धूळ केसात जाते आणि केसांचा गुंता होतो. त्यामुळे शक्यतो केसांना धुळीपासून दूर ठेवावे.

नारळाचे तेल

- Advertisement -

केसात गुंता होऊ नये, याकरता दोन दिवसांनी नारळाचे तेल केसांना लावावे. यामुळे केसांचा गुंता होत नाही. तसेच गुंतलेले केस सोडवण्यासाठी देखील नारळाचे तेल उपयुक्त ठरते.

मोठ्या दाताचा कंगवा वापरा

केसाचा गुंता सोडवण्यासाठी बारीक दाताचा कंगवा न वापता मोठ्या दाताचा कंगवा वापरावा. यामुळे केसातील गुंता सहज निघण्यास मदत होते.

सिरम लावावे

केसांचा गुंता होऊ नये, याकरता केस धुतल्यानंतर सिरमचा वापर करावा. यामुळे केसात गुंता होत नाही.

थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवावे

केस धुताना शक्यतो गरम पाण्याचा वापर करणे टाळावे. गरम पाण्याने केस धुतल्यास केसांचा गुंता अधिक होतो. त्यामुळे कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करुन केस स्वच्छ करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -