घरलाईफस्टाईलघराच्या स्वच्छतेसाठी 'व्हिनेगर' एक रामबाण उपाय

घराच्या स्वच्छतेसाठी ‘व्हिनेगर’ एक रामबाण उपाय

Subscribe

स्वच्छतेसाठी 'व्हिनेगर' एक रामबाण उपाय

बऱ्याचदा जेवणामध्ये आंबटगोड चवीसाठी चिंच आणि गूळ वापरले जाते. त्याप्रमाणे चायनीज पदार्थामध्ये व्हिनेगर आणि साखर वापरली जाते. आम्लधर्मी असल्याने व्हिनेगरला आंबट चव असते. मात्र, हा पदार्थ केवळ जेवणापुरताच मर्यादित नसून त्याचा स्वच्छेकरता देखील चांगला वापर करु शकता. बऱ्याच वेळा आपल्याला साफसफाई करण्याचा फार कंटाळा येतो. मात्र, घरात स्वच्छता राखली नाही तर किटकांचे साम्राज्य पसरते आणि त्यातूनच मग रोगराईला आमंत्रण मिळते. त्यामुळे घराची स्वच्छता ही राखली गेलीच पाहिजे. विशेष म्हणजे व्हिनेगरच्या वापरामुळे घर स्वच्छ करता येऊ शकते. चला तर मग पाहुयात व्हिनेगरचे फायदे…

फरशी साफ करण्यासाठी

- Advertisement -

सध्या घरात अनेकांच्या घरामध्ये व्हाइट फरशी असते. त्यामुळे ती नित्यनियमाने पुसावी लागते. कारण त्यावर पडलेले डाग लगेच दिसतात. अशावेळी फरशी किंवा फ्रिज साफ करायचा असल्यास तुम्ही पाण्यामध्ये थोडे व्हाइट व्हिनेगर टाकून फरशी किंवा फ्रिज पुसून घ्या. त्यामुळे डाग लगेच निघतात. मात्र संगमरवर किंवा ग्रेनाइटची फरशी असेल तर त्यावर व्हिनेगर टाकू नये.

- Advertisement -

मुंग्यांना पळवा

बऱ्याचदा जमिनीवर एखादा गोड पदार्थ पडला की, लगेचच मुंग्या त्यावर येतात. मात्र, या मुंग्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर त्यावर व्हिनेगर हे अत्यंत उपयोगी आहे. मुंग्यांना व्हिनेगरचा वास सहन होत नाही. त्यामुळे त्या पळ काढतात. यासाठी व्हिनेगरमध्ये समप्रमाणात पाणी घेऊन हे पाणी मुंग्या असलेल्या ठिकाणी शिंपडावे.

कपड्यांवरील डाग

कपड्यांवर एखादा तेलाचा डाग पडल्यास तो सहजासहजी निघत नाही. अशावेळी व्हिनेगरचा वापर करावा. कपडे धुण्यापूर्वी अशा डागावर व्हिनेगर लावावे आणि थोड्यावेळ तसेच ठेऊन द्यावे त्यानंतर हे कपडे धुवावेत. चिकट डाग सहज निघतात.

फुले ताजी राहतात

फुले ताजी राहण्यासाठी फुलदाणीमध्ये व्हाइट व्हिनेगर टाकावे. यामुळे फुले बरेच दिवस टिकून राहतात.

अंडी उकडताना

बऱ्याचदा अंडी उकडताना ती फुटतात. ती फुटू नये, याकरता अंडी उकडण्यापूर्वी गरम पाण्यात व्हिनेगर टाकले तर अंडी फुटत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -