घरलाईफस्टाईलसुट्टीत या ठिकाणांना भेट द्या

सुट्टीत या ठिकाणांना भेट द्या

Subscribe

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर शाळा कॉलेजचा सुट्ट्यांचा काळ सुरू होतो. त्यामुळे या दिवसात ट्रीपचे प्लॅनिंग सुरू होते. अनेक जण पॅकेज टूरऐवजी स्वतःहून टूर प्लॅन करण्याकडे अधिक भर देतात. मग वाढत्या उन्हापासून थोडे दिवस लांब जाऊन एखादी ट्रीप प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर या थंड हवेच्या ठिकाणांचा नक्की विचार करून पहा.

काश्मीर – काश्मीरमध्ये हिवाळ्यात बर्फात खेळण्याची जशी मज्जा असते तसेच उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा अनुभवण्यासाठी काश्मीरला नक्की भेट द्या.
बर्फाळ डोंगरात अनेक खेळ आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी काश्मीर हा उत्तम पर्याय आहे.

- Advertisement -

मनाली – काश्मीरप्रमाणेच हिमाचल प्रदेशदेखील उन्हाळ्याच्या दिवसात पर्यटकांच्या आवडीचे एक ठिकाण आहे. हिमाचल प्रदेशमध्ये शिमला, कुलू, मनाली ही ठिकाणे पर्यटकांच्या आवडीची आहेत. काश्मीरप्रमाणेच मनाली, रोहतांग या परिसरातही बर्फात खेळण्याची संधी मिळते.

मसुरी – उत्तराखंड परिसरामध्ये मसुरी ही पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. मसुरीमध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथे तुम्ही शांतपणे फिरू शकता. सोबत उन्हापासून दूर मस्त निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेऊ शकता.

- Advertisement -

दार्जिलिंग – तुम्ही चहाचे शौकीन असाल आणि सोबतच पर्यटन हा तुमचा आवडता विषय असेल तर दार्जिलिंग हे उत्तम पर्यटनस्थळ आहे. दार्जिलिंगमध्ये चहाचे मळे पाहणे आणि सोबतच हिल स्टेशनवर काही काळ राहणे हा अनुभव सुखावह असतो. या ठिकाणी तुम्ही टॉय ट्रेनच्या माध्यमातूनही फिरू शकता. टॉय ट्रेनचा आनंद लुटणे हा अनुभव फारच मस्त ठरणार आहे.

नैनीताल – घनदाट जंगलातील निसर्गसौंदर्य अनुभवायचे असल्यास नैनीताल हे एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. उन्हाळ्यात फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -