डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी रोज खा ‘अक्रोड’

न्यूट्रेंट जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यानुसार अक्रोड खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा वाढते आणि एकाग्रताही चांगली वाढते.

Mumbai
benefits eating walnut or akroad
दररोज एक अक्रोड खा!

आजकालच्या या मॉडर्न लाइफस्टाइल असलेल्या जगात वेगवेगळे आजार अगदी जलदगतीने पसरत चालले आहेत. डिप्रेशन हा त्यातील सर्वात मोठा आजार असल्याचे समोर आले आहे. त्यावर अनेक संशोधने देखील केली गेली. अमेरिकेत केलेल्या संशोधनामध्ये डिप्रेशनवर अनेक खुलासे करण्यात आले आहेत. डिप्रेशन हा आजार नाहीसा करण्यासाठी अक्रोड अतिशय उपयोगी असल्याचे समोर आले आहे.

हा अभ्यास न्यूट्रेंट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या रिसर्चमधून असं आढळलं की, अक्रोड खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा वाढते आणि एकाग्रताही चांगली वाढते. प्रमुख संशोधक लेनोर अरब यांनी केलेल्या अभ्यासानुसार ६ पैकी १ जण जीवनात एका वळणावर डिप्रेशन ग्रस्त होतो. कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील अभ्यासकांना नियमित अक्रोड खाणाऱ्या लोकांमध्ये डिप्रेशनचा स्तर २६ टक्के कमी आढळला तर त्याचप्रमाणे इतर पदार्थ खाणाऱ्यांमध्ये अक्रोड डिप्रेशनचा स्तर ८ टक्के कमी आढळला.

अक्रोडचे फायदे

अरब यांनी सांगितल्यानुसार, अक्रोडवर आधी हृदयरोगाशी संबंधित शोध करण्यात आला होता आणि आता याचाकडे डिप्रेशनवर उपचार म्हणून बघितले जात आहे. या रिसर्चमध्ये २६ हजार अमेरिकन वयस्कर लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.  हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणावरही अक्रोड लाभदायक आहे. डाएटमध्ये दररोज 5 अक्रोड आणि 15 ते 20 मनुक्यांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते. अक्रोडमध्ये मेलाटोनिन आढळून येतं जे झोपेसाठी परिणामकारक ठरतं.  अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ‘इ’, अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने त्याच्या नियमित सेवनाने 28 टक्के पुरुषांच्या तणावग्रस्त आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे. दररोज अक्रोड खाण्यामुळे बराचसा तणाव कमी होतो, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.