Sarva Pitru Amavasya 2020 : अजब प्रथा; पितृपक्षात करतात लग्न

no more than 50 guests allowed in marriage in pune strict social distancing norms to be followed
लग्न

श्राद्धाच्या महिन्यात शुभ कार्य करू नये अशी धारणा आहे. मात्र मंडी आणि कुल्लूमध्ये याच्या विरूद्ध परंपरा आहे. या ठिकाणी श्राद्धाच्या महिन्यात देव आज्ञा मानून लग्न केले जातात. या लग्नांमध्ये न मंत्रोच्चार होतात, ना सप्तपदी घेतली जाते. या महिन्यातील ४ सप्टेंबर रोजी मंडी येथील चौहणमध्ये अशा प्रकारचा लग्नसोहळा पार पडला होता. या परिसरात वर्षानुवर्षांची परंपरा रूढ आहे. येथे मुलगा-मुलगी जत्रेत एकमेकांना पसंत करतात. त्यानंतर मुलगा मुलीला स्वतःच्या घरी आणतो. आता जत्रेतून पळून जाण्याची प्रथा कमी झाली आहे. मात्र पसंतीनुसार मुलीला घरी आणून घरचे तिला देव आज्ञा मानून स्विकारतात आणि त्यांचे लग्न लावून देतात. असे लग्न श्राद्धाच्या महिन्यातच होते.

जत्रेतून मुलगा मुलीला आपल्या घरी आणतो. त्यानंतर कुटुंबिया मुलीला पुन्हा तिच्या घरी सोडतात. त्यांच्या कुलदैवताच्या पुजाऱ्याने दिलेल्या आदेशानुसार लग्नाचा दिवस निश्चित केला जातो. नंतर मुलीच्या घरी वरात घेऊन जातात. मुलगा मुलीला मंगळसूत्र घालतो आणि मुलीची नवऱ्याच्या घरी पाठवणी केली जाते. ही सर्व प्रक्रिया देवाच्या साक्षीने केली जाते. दोन दिवस देव नवऱ्याचा घरात राहतात, अशी त्यांची धारणा आहे. असेच एक अजब लग्न ४ सप्टेंबर रोजी घाटीच्या चौहण येथे पार पडले. येथील निवासी सुनील कुमार आणि सुषमा देवी यांनी अशा प्रथेनुसार लग्न केले. हे लग्न कोविड १९ च्या नियमांनुसार पार पडले.

हेही वाचा –

फुगलेल्या वीजबिलांमध्ये ग्राहकांना दिलासा