घरलाईफस्टाईलपिकनिकला जायचं...इथं क्लिक करा

पिकनिकला जायचं…इथं क्लिक करा

Subscribe

विकेंडला पिकनिकला जायचे असल्याच या ठिकाणांना नक्की भेट द्या.

धावपळीच्या जिवनात बर्‍याच दिवसांपासून कुठेतरी जायचं असं वाटतं असेलच ना. पण सुट्टी प्लान होत नव्हती आणि वेळ हि मिळत नव्हताना. मात्र आता ही संधी आली आहे. कारण या आठवड्यात लॉंग विकेंड असल्यामुळे तुम्ही फॅमेलीसोबत मस्त प्लॅन करु शकता. मात्र कुठे जायचे हा प्रश्न पडला असेलच? परंतु काळजी करु नका. कारण मुंबईलगत अशी काही ठिकाण आहेत जिथे तुम्ही विकेंडचा आनंद लुटू शकता.

निसर्गसौंदर्याने नटलेले माथेरान

मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. इथलं हवामान अति थंड किंवा उष्ण असे कधीच नसते. तसेच माथेरानच्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्यामुळे येथे थंडावा अधिक जाणवतो. माथेरानमध्ये आढळणार्‍या प्राणीवर्गात सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते म्हणजे माकडांचे. माकडांप्रमाणेच रानमांजरे, हरणे, ससे हे प्राणी इथे आहेत. शिवाय जंगलातून कधीकधी बिबटे देखील दिसतात. इथल्या पक्षीसृष्टीत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुलबुल, दयाळ, लार्क, तांबट, किंगफिशर, धनेश, रॉबिन, बार्बेट आदि पक्षी आहेत. त्याचप्रमाणे पॅराडाइज फ्लायकॅचर नावाचा एक पांढराशुभ्र आणि लांब शेपटी असणारा पक्षी इथे आढळतो. माथेरान मध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत. या ठिकाणी अनेक हॉटेल्स तसेच अनेक बैठी घर देखील आहे. या ठिकाणी खाण्या – पिण्याच्या उत्तम सोयी आहेत. त्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या माथेरानला नक्की भेट द्या.

- Advertisement -

karjat-matheran

महाबळेश्वर

महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. तसेच खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंट्स खूप आकर्षक असून विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिग पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध आहेत. तसेच हे पॉइंट डोंगरकडे असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे आणि बसमार्गाने देखील प्रवास करु शकता. त्याचप्रमाणे येथे राहण्यासाठी बऱ्याच सोयी देखील आहेत. त्यामुळे या विकेंडला महाबळेश्वरला नक्की भेट द्या.

- Advertisement -

Mahabaleshwar_Arthur_ Seat_Point_Main

थंड हवेचे ठिकाण लोणावळा

लोणावळा हे महाराष्ट्रातील एक मुख्य पर्यटनस्थळ आहे. तसेच लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळा येथे गेल्यानंतर सुनीलची सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय, लायन पॉइंट, कार्ला लेणी, पवना लेक, किनारा ढाबा, लोहगड किल्ला आणि कामशेठ पॅराग्लाइडिंग या ठिकाणी आवर्जून भेट देण्यासारखे आहे. तसेच लोणावळ्याला गेल्यानंतर त्याठिकाणाची चिक्की हा खाण्यास विसरु नका. तसेच या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय आहे.

lonavala

अलिबागचा समुद्रकिनारा

अलिबाग हे मुंबई, पुण्यापासून एक दिवसाच्या सहलीसाठी जवळचे ठिकाण आहे. अलिबाग हे समुद्रकिनाऱ्यासाठी आणि सीफूडसाठी प्रसिद्ध आहे. तसेच अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याशिवाय किहीम, नवगाव, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस, चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत. त्यामुळे या ठिकाणी लहान मुलांना घेऊन गेल्याने ते सुट्टी चांगलीच एन्जॉय करु शकतील. त्यामुळे सुट्टीत एकदा तरी अलिबागला नक्की भेट द्या.

Alibaug beach

सगुणा बाग

नेरळ स्थानकापासून अगदी जवळ असलेली सगुणा बाग. माथेरान फिरुन झाल्यानंतर घरी जाताता देखील या सगुणा बागेला तुम्ही भेट देऊ शकता. सकाळपासून रात्रीपर्यंत एक दिवस तुम्ही मज्जेत घालवू शकता. सकाळी पोटभर नाष्टा करायचा आणि सगुणाबागेत फिरायला सुरूवात करायची. सगुणाबागेच्या बाजूने वाहणारी नदीत तुम्ही मनसोक्त पोहण्याचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर त्यांनी लावलेल्या शेतात भाजी काढण्याची मजाही तुम्ही इथे घेऊ शकता. दुपारी जेवण झाल्यावर आंब्याच्या झाडावरील घरात किंवा झाडाखाली मस्त वामकुक्शी घेऊ शकता. त्याचबरोबर सगुणबागेत तयार करण्यात आलेल्या artificial तळ्यांमध्ये बोटीचा, मासे पकडण्याचा आनंद देखील घेऊ शकता.

Pond-House

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -