घरलाईफस्टाईललठ्ठपणा कमी करण्यासाठी उन्हाळ्यात हे उपाय करा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी उन्हाळ्यात हे उपाय करा

Subscribe

बऱ्याचदा असं बोलं जातं की वजन कमी करायचे असेल तर हिवाळा हा एक उत्तम असा ऋतू आहे. मात्र, सर्वच ऋतू आरोग्यासाठी चांगले असतात. परंतु, त्या त्या ऋतू मध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहते. तसेच उन्हाळ्यात काही उपाय केल्यास जसे हिवाळ्यात वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात देखील काही उपाय केल्यास लठ्ठपणा कमी होतो. चला तर जाणून घेऊया उपाय.

सातत्याने पाणी प्यावे

- Advertisement -

उन्हाळ्यात तहान अधिक प्रमाणात लागते. लठ्ठ व्यक्तीने थोड्या – थोड्यावेळाने पाण्याचे सेवन केल्यामुळे भूक मंदावते. तसेच भूक लागल्यास पाण्याचे सेवन करावे. पाणी चरबीचे विलयन होण्यास मदत करते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी

- Advertisement -

तांब्याच्या भांड्यातील पाणी हे आरोग्यास उत्तम असते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात अहोरात्र पाणी टेवून नंतर गरम करुन प्यायल्याने त्याचा अधिक फायदा होतो.

झोपताना पाणी प्यावे

जेवताना पाणी पिणे शक्यतो टाळावे. जेवण झाल्यानंतर किंवा रात्री झोपताना एक ग्लास पाणी प्यावे आणि मग झोपावे याचा चांगला फायदा होतो.

पेय

वजन कमी करायचे अल्यास उन्हाळ्यात पेय पिणे एक उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात सतत तहान लागते, अशावेळी थंड काहीतरी प्यावेसे वाटते. अशावेळी पाणी, लिंबाचा रस, आल्याचा रस आणि चवीपुरते सैधंव मीठ, साखर टाकल्यास चवदार पेय तयार होईल.

दुधाचे सेवन

दुधात पाव पट पाणी मिसळून त्यात दालचिनी किंवा इलायची टाकल्याने अधिक लाभ होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -