प्रवासात तुम्हालाही होते उलटी? जाणून घ्या उपाय

तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल आणि अश्यकतपणा येत असेल तर जाणून घ्या यावरचे घरगुती उपाय.

what to eat for stop vomiting
प्रवासात तुम्हालाही होते उलटी? जाणून घ्या उपाय

उलटी, मळमळ हा त्रास बऱ्याच जणांना होत असतो. तर अनेकांना प्रवासा दरम्यान हा त्रास होतो. तर बऱ्याचदा वेळेत झोप न येणे, अनियमित जेवण, उलट सुलट खाण्याच्या सवयीमुळे देखील हा त्रास होतो. जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल आणि अश्यकतपणा येत असेल तर जाणून घ्या यावरचे घरगुती उपाय.

लिंबाचा रस

जर तुम्हाला वारंवार उलटी, मळमळ होत असेल तर अर्ध्या लिंबाच्या रसामध्ये अर्धा ग्रॅम जिरे, अर्धा ग्रॅम वेलचीचे दाणे वाटून पाण्यामध्ये मिक्स करा. दिवसभरातून थोडा थोडा रस घेत रहा. त्यामुळे उलटी होणे कमी होते.

लिंबू-मध

प्रवासामध्ये तुम्हाला जर उलटीचा त्रास होत असेल तर तुम्ही सोबत लिंबू ठेवा. एक चमचा लिंबाच्या रसात एक चमचा मध मिसळून पिल्यानंतर उलटीचा त्रास कमी होतो.

पुदिना

पुदिना खाल्ल्याने देखील मळमळ आणि उलटी पासून त्वरित आराम मिळतो. एक कप पाण्यामध्ये पुदिन्याची पाने टाकून ती दहा मिनिटे उकळा आणि त्यानंतर हे पाणी प्या. त्यामुळे उलटी, मळमळ पासून सुटका होते.