गव्हाच्या पीठाचा चविष्ट नाश्ता

Wheat flour easy breakfast recipe in marathi
गव्हाच्या पीठाचा चविष्ट नाश्ता

बऱ्याचदा नाश्ता काय करावा, असा सर्वच गृहिणींना प्रश्न पडतो. त्यात तो नाश्ता पोष्टिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पीठाचा चविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहोत.

साहित्य

  • १ वाटी गव्हाचे पीठ
  • अर्धी वाटी दही
  • चवीनुसार मीठ
  • गरजेनुसार पाणी
  • हळद
  • कोथिंबीर
  • जीरं
  • मिरची
  • बारीक चिरलेला कांदा

कृती

सर्वप्रथम गव्हाचे पीठ घेऊन त्यात दही घालावे. नंतर चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीवन करुन घ्यावे. त्यानंतर त्या थोडे थोडे गरजेनुसार पाणी घालून त्याच्या गुठळ्या काढून घ्यावे. सर्व मिश्रण एकजीव करुन मिश्रण ४५ मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, जीरं, हळद आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर एका पॅनवर तेल घालून मिश्रण एकसारखे पसरवून घ्यावे. अशाप्रकारे गव्हाच्या पीठाचा चविष्ट नाश्ता लहान मुलांना डब्याला देखील देऊ शकता.