घरलाईफस्टाईलबाळासाठी कपडे खरेदी करताना...

बाळासाठी कपडे खरेदी करताना…

Subscribe

घरात बाळाचे आगमन होणे हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण असतो. बाळाच्या आगमनापूर्वीपासूनच त्याच्यासाठी करावयाच्या विविध गोष्टींची यादीच आपण करतो. त्यात एक यादी असते बाळासाठीच्या कपड्यांची. बाळासाठी कपड्यांची खरेदी करताना काही प्रश्न हमखास पडतात आणि त्यातून योग्य कपड्यांची निवड करणे कठीण जाते. म्हणून बाळासाठी कपडे खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक ठरतो.

अधिक वयाचे कपडे खरेदी करा – लहान बाळाची वाढ वेगाने होत असते. त्यामुळे सहा महिन्यांच्या बाळाला ३ ते ४ महिन्यातील त्याच्यासाठी खरेदी केलेले कपडे तोकडे पडतात. परिणामी खरेदी केलेले कपडे लवकर टाकून द्यावे लागतात. त्यामुळे बाळ लहान असो वा मोठे, त्याच्या वयाच्या मानाने अधिक वयाचे कपडे खरेदी करावे. म्हणजे सहा महिन्यांचे मूल असेल तर त्याला नऊ ते १२ महिन्यांच्या मुलाच्या मापाचे कपडे घालता येतात. याशिवाय बाळासाठी कपडे खरेदी करताना ऋतुमान लक्षात घेऊन उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या मुख्य ऋतूंसाठी मुलांना स्वतंत्र कपड्यांची खरेदी करावी. उन्हाळ्याच्या दिवसात मुलांसाठी कपडे खरेदी करताना शक्यतो सुती, मऊ कपड्यांना प्राधान्य द्यावे.

- Advertisement -

अलीकडे ऑनलाइन खरेदीची चलती आहे. मुलांसाठी खरेदीसाठी स्वतंत्र शॉपिंग साईट्स आता उपलब्ध आहेत. या शॉपिंग साईट्सवर अनेकदा उत्तम ऑफर्स देण्यात येतात. मुलांसाठी कपडे खरेदी करताना उत्तम ब्रँडेड कपड्यांसाठी या साईट्स फायदेशीर ठरतात, परंतु ऑनलाइन शॉपिंग करण्यापूर्वी कपड्यांची योग्यता आणि मूल्य यांची तुलना करून त्यानंतरच खरेदी करावी. वाढदिवस, सणसमारंभ आदी महत्त्वाच्या दिवशी नातेवाईकांकडून लहान मुलांना अनेकदा कपड्यांची भेट दिली जाते. नातेवाईकांनी दिलेले कपडे पुढे वापरात येत नाहीत. तेव्हा आई बाबांनी लहान मुलांसाठी कपड्यांची खरेदी करताना अनावश्यक खरेदी टाळावी आणि नातेवाईकांनी दिलेल्या कपड्यांचा वापर प्राधान्याने करावा. लहान बाळाला बाहेर फिरायला घेऊन जाताना बहुतेक पालकांना मुलांना ब्रँडेड, भारीचे कपडे घालण्याची इच्छा असते. मात्र, या कपड्यांमुळे मुले चिडचिडेपणा करू शकतात. तेव्हा बाहेर फिरायला जाताना मुलांसाठी साधारण कपड्यांचाच वापर करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -