घरलाईफस्टाईलमेकअप करताना...

मेकअप करताना…

Subscribe

मेकअप करणे हा समस्त महिला वर्गाचा अगदी आवडता विषय. मेकअप करताना झालेल्या चुका आपल्याला निराश करू शकतात. विशेषतः उन्हाळ्यात मेकअप करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हा मेकअपसाठी उपयुक्त खास टिप्स…

मेकअप प्रोडक्ट्सची मुदत तपासा – अनेकदा आपण मेकअपचे चांगले प्रॉडक्ट संपेपर्यंत वापरतो. असे प्रॉडक्ट्स कालबाह्य झाले तरीही आपण त्याचा वापर करतच असतो. परिणामी आपल्याला खाज, मुरुमे सारख्या त्वचाविकारांना सामोरे जावे लागू शकते. तसेच कालबाह्य प्रॉडक्ट्समुळे मेकअप चांगला होईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे मेकअप प्रॉडक्ट्स वापरताना त्यांची मुदत तपासणे गरजेचे आहे.

- Advertisement -

ब्रशेसची स्वच्छता न ठेवणे – ब्रशेस ही महत्त्वाची मेकअप साधने आहेत. त्यामुळे मेकअप ब्रशेसची स्वच्छता ठेवणे महत्त्वाची बाब आहे. जुने, खूप वेळ वापरलेल्या ब्रशेसवर जंतू वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मेकअप ब्रशेस नियमितपणे डिटर्जेन्ट आणि गरम पाण्यात स्वच्छ करा. त्यानंतर अँटिसेप्टिक क्रीममध्ये काही काळ हे ब्रशेस भिजत ठेवा. लक्षात ठेवा ब्रश पूर्णपणे कोरडे होण्यापूर्वीच ते मेकअप बॉक्समध्ये ठेऊ नका. नाहीतर ब्रशेसवर जंतू वाढण्यास सुरुवात होईल.

आयब्रोज ठळक करताना – महिलांनी आयब्रोज ठळक करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आयब्रोज डार्क करताना आयब्रो पेन्सिल, जेल, पावडरचा वापर करण्यात येतो. आयब्रो पेन्सिल, जेल, पावडरची निवड करताना भुवयांच्या रंगांशी जुळत्या रंगांचाच वापर करावा. भुवया डार्क करताना अधिक गडद शेड्सचा वापर टाळावा. अन्यथा तुमच्या भुवया कृत्रिम वाटू शकतात.

- Advertisement -

ब्रॉन्झरचा योग्य वापर करा – चेहर्‍याचे सौंदर्य खुलविण्यात ब्रॉन्झर महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. तरीही ब्रॉन्झरचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. खूप मोठ्या प्रमाणात तसेच संपूर्ण चेहर्‍यावर ब्रॉन्झर लावणे टाळावे. कपाळ, नाकाच्या दोन्ही बाजूला हलकेच ब्राँझरचा वापर करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -