ट्रेनने प्रवास करताना

उन्हाळ्याच्या सुट्टीत देशांतर्गत फिरायला जाण्याचा बेत तुम्ही नक्कीच आखला असणार. फिरायला जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास निवडला असल्यास आयत्या वेळी होणारी धांदल टाळण्यासाठी काही युक्त्या माहीत असणे गरजेचे आहे.

Mumbai
Traveling

तिकिटांचे ऑनलाइन बुकींग, पीएनआर स्थिती तपासा
माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आज अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. पूर्वी रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास करताना तिकिटांसाठी तासंतास रांगेत ताटकळत रहावे लागत असे. मात्र, माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आज अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आज प्रवास करणेही सोपे झाले आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आयआरसीटीसी कनेक्ट, कन्फर्म तिकीट, रेलयात्री या अ‍ॅपद्वारे तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक करू शकता. रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले की नाही की तिकीट वेटींग लिस्टवर आहे हे तपासण्यासाठी पीएनआर स्थिती चेक करा. अ‍ॅपच्या सहाय्याने घरबसल्या तिकिटांची बुकींग स्थिती, ट्रेनच्या वेळेसंदर्भात इतर माहिती जाणून घेता येते.

जेवण ऑनलाइन बुक करा
रेल्वेने प्रवास करताना जेवण सोबत घेतले नसल्यास काळजी नसावी. आयआरसीटीसीच्या ई-केटरिंग पोर्टलवरून किंवा अधिकृत इ-केटरिंग सेवा भागीदारांकडून प्रवाशांना आपल्या जेवणाची सोय करता येते. आयआरसीटीसीच्या ई-केटरिंग पोर्टलच्या आधारे जेवण आरक्षित केल्यास प्रवाशांना त्यांच्या सीटवरच, रुचकर जेवण मिळते.

तत्काळमध्ये तिकीट बुक करा
अनेकदा वेटींग लिस्टमधील तिकीट कन्फर्म होत नाही. अशावेळी प्रवाशांसाठी तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांचा पर्याय खुला असतो. मात्र, तत्काळ तिकिटांसाठी प्रवाशांना थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतात. शिवाय तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ आरक्षणाचा लाभ प्रवासाच्या एक दिवस अगोदरच लाभ घेता येतो.

बर्थची निवड करताना
रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करताना सोबत जर वयोवृद्ध व्यक्ती असेल तर तिकीट बुक करताना शक्यतो खालच्या बर्थची निवड करावी. त्यांच्या आरामासाठी व सोयीसुविधेसाठी खालचा बर्थ सोयीचा ठरतो.

ट्रेनचा माग घ्या
आता काही अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही आपल्या ट्रेनचा माग ठेवू शकता. विशेष म्हणजे ह्या अ‍ॅपमध्ये ऑफलाइन ट्रॅकिंग फीचर असते. म्हणजे तुमच्या गाडीचे स्थान जाणण्यासाठी तुम्हाला जलद इंटरनेट कनेक्शनची गरज नसते.

तिकीट रद्द करताना
कधी कधी काही कारणास्तव बाहेर जाण्याचे रद्द होते. अशावेळी आरक्षित तिकीट रद्द करावे लागते. तिकीट रद्द करायचे असल्यास गाडी सुटण्यापूर्वी ४ तास अगोदरपर्यंत तिकीट रद्द करता येते. मात्र, तिकीट रद्द केल्याने रद्द केल्याचे शुल्क कापले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here