घरलाईफस्टाईलकेस अकाली पांढरे का होतात?

केस अकाली पांढरे का होतात?

Subscribe

सध्याच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांचे केसदेखील पांढरे होतात. आजकाल वय कमी असले तरी केस पांढरे होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पूर्वीच्या काळात एक ठरावीक वयोमर्यादा ठरलेली असायची त्या वयातच केस पांढरे व्हायचे, परंतु सध्याच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांचे केसदेखील पांढरे होतात. या समस्येला अनुवंशिक मानले जाते, पण इतर दुसरी कारणेदेखील आहेत. कोणती आहेत त्याची कारणे जाणून घेऊया..

प्रदूषण
हवेतील बदलामुळे केसांना नुकसान पोहोचते. हवेत असणार्‍या प्रदूषणातील घटकामुळे केस लवकरात लवकर पांढरे होण्यास कारणीभूत ठरतात. प्रदूषणातील घटकामुळे रेडिकल्स मेलानिनला नुकसान पोहोचवते तसेच केसांना पांढरे करण्याचे काम करते.

- Advertisement -

ताण तणाव
केस पांढरे होण्यास ताण तणाव हे मुख्य कारण असू शकते. ताण घेतल्याने केसांचा नैसर्गिक रंग नाहीसा होतो. त्यामुळे तणावापासून दूर राहिलेले योग्य ठरेल.

धूम्रपान
धूम्रपान केल्यानेदेखील केस पांढरे होऊ शकतात. जे लोक धूम्रपान करतात त्यांचे केस कमी काळात पांढरे होतात. याशिवाय धूम्रपानाच्या नियमित सेवनाने गंभीर आजाराला सामोरे जावे लागते.

- Advertisement -

हार्मोन
शरीरातील हार्मोनची पातळी बिघडल्यानेदेखील केस पांढरे होण्याची शक्यता असते. हार्मोनचे संतुलन बिघडल्याने केसांच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे केसांचे सौंदर्य नष्ट होऊन केस गळण्याची समस्या निर्माण होते.

अनहेल्दी डाइट
आहाराचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय आहारतील न्यूट्रिएंट्सच्या कमतरतेमुळेदेखील केस पांढरे होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -