घरलाईफस्टाईलथंडीत आईस्क्रिम का खावे?

थंडीत आईस्क्रिम का खावे?

Subscribe

जाणून घ्या थंडीत का खावे आईस्क्रिम?

उन्हाळ्यात आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच असते. तहानलेल्या घशाला थंडगार आईस्क्रिम सुखद अनुभव देऊन जाते. पण जर तुम्हाला कोणी थंडीत आईस्क्रिम खाण्याची ऑफर दिली तर.. एकतर आपण समोरच्याला वेड्यात काढतो किंवा आईस्क्रिम खाण्यास नकार देतो. पण तज्ज्ञ मंडळींच्या मते आईस्क्रिम खाण्यासाठी हिवाळा हा उत्तम सिझन आहे.

- Advertisement -

कारण या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाण कमी झालेले असते. त्यामुळे घसा कोरडा तर पडतोच पण शरीराचे तापमानही कमी झालेले असते. यामुळे शरीराला पाण्याची गरज तर असतेच पण कोरडया पडलेल्या त्वचेला तजेला मिळण्यासाठी पाण्याची आणि थंड पेयाची गरजही असते. यामुळे या दिवसात थंड पदार्थ खाल्ल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते, असा दावा अमेरिकेच्या तज्ज्ञांनी केला आहे. तसेच हिवाळ्यात निरनिराळ्या प्रकारची फळेही उपलब्ध असतात. त्याचाही आस्वाद आवर्जून घ्यावा, असा सल्ला या तज्ज्ञ मंडळींनी दिला. त्यासोबतच आईस्क्रिमबरोबर पुडींग, जेली, सूप, ज्यूस, ब्राऊनी यांचेही सेवन करण्यास तज्ज्ञानी सांगितले आहे.


हेही वाचा – सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -