घरलाईफस्टाईलजाणून घ्या...हिवाळ्यात कोणते आजार हमखास होतात?

जाणून घ्या…हिवाळ्यात कोणते आजार हमखास होतात?

Subscribe

हिवाळ्यात होणाऱ्या आजारांवर घरगुती उपाय

सध्या वातावरणात गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवेतील जसजसा गारवा वाढेल तसे काही जणांना ताप, सर्दी, खोकला होण्यास सुरुवात होऊ शकते. दरम्यान, असे काही आजार आहेत जे हिवाळ्यात हमखास होतात. चला तर जाणून घेऊया असे कोणते आजार आहेत आणि ते झाल्यास नेमके काय करावे?

सर्दी

- Advertisement -

हिवाळ्यात सर्दी हा हिवाळ्यात होणारा हमखास आजार आहे. शरीरातील उष्णता कमी झाल्यामुळे आणि वातावरणातील गारव्यामुळे हा आजार या ऋतूमध्ये होण्याची शक्यता जास्त राहते.

उपाय

नियमितपणे हात स्वच्छ धुवावेत ज्यामुळे किटाणू आपल्या संपर्कात येणार नाहीत. भरपूर प्रमाणात पाणी आणि फळांचा रस घ्यावा. व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी आंबट फळे खाऊ शकता. नाश्तामध्ये संत्र्याचा ज्यूस प्यावा किंवा द्राक्षही खाऊ शकता. तसेच आल्याच्या तुकड्यांचा काढा २० मिली ते ३० मिली दिवसभरातून ३ वेळेस घेतल्यास सर्दीच्या त्रासापासून आराम मिळतो.

- Advertisement -

कोरडी त्वचा

थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांची त्वचा कोरडी पडते. सुरकुत्या पडणे, खाज येणे अशा विविश समस्या निर्माण होतात. म्हणूनच या दिवसांमध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

उपाय

कोरड्या त्वचचेवर बदाम आणि नारळाचे तेल शरीरावर लावणे हा एक रामबाण उपाय आहे. त्यासोबतच गुळ टाकलेला चहा घ्यावा. कारण थंडीच्या दिवसात शरीराला गरमीची आवश्यकता असते. गुळ ही गरज पूर्ण करतो. गूळ उष्ण असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच संपूर्ण शरीराचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी मध, हळद, बेसन समप्रमाणात घेऊन पाणी न टाकता स्क्रब तयार करून घ्या. त्याचप्रमाणे अंघोळीपूर्वी शरीराला हा स्क्रब एक दिवसाआड लावल्यास त्वचा उजळते.

घसा खवखवणे

हवामान बदलाच्या वेळी घसादुखीचा त्रास अधिक होतो. हिवाळ्यात वातावरणातील कॉमन कोल्ड व्हायरसमुळे सोअर थ्रोट (घसा खवखवणे) ची समस्या निर्माण होते.

उपाय

कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून खळखळून गुळण्या करणे हा या आजारावर एक फार प्रभावी उपाय आहे.

दम लागणे

थंड हवेमुळे हिवाळ्यात दमा असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो.

उपाय

घराबाहेर पडण्यापूर्वी मफलर, स्वेटर, उबदार कपडे परिधान करावेत. तसेच अशावेळी ओवा गरम करून एका छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा. यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासूनही बचाव होतो.

सांधेदुखीचा त्रास

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांना प्रचंड वेदना होतात. त्यामुळे या लोकांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

उपाय

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत अतिश्रम टाळावे. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावी. कसेच आर्थरायटीसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात होणाऱ्या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास आराम मिळतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -