घरलाईफस्टाईलहिवाळ्यातील खास ब्युटी टीप्स

हिवाळ्यातील खास ब्युटी टीप्स

Subscribe

* कच्चे दुध सर्वोत्तम क्लिंजर मानले जाते. तुमची त्वचा तेलकट असो वा कोरडी सर्व त्वचेच्या प्रकारांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

* जर तुमची त्वचा कोरडी असेल तर एक चमचा मध घ्या आणि त्यात दही मिसळा. साधारण १५-२० मिनिटे हे हे मिश्रण चेहर्‍याला लावा. त्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेहर्‍याची त्वचा चमकदार होईल.

- Advertisement -

* एक चमचा ग्लिसरीन, अर्धा चमचा व्हिनेगर, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करून तयार झालेले मिश्रण चेहर्‍याला लावून थंड पाण्याने चेहरा धुवा.

* जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल आणि तुमच्याकडे तुम्ही वापरत नसलेली एखादी जुनी क्रिम पडून असेल तर त्यात व्हिटॅमिन ‘ई’चे कॅप्सुल मिसळून ते क्रिम दररोज चेहर्‍याला लावा. त्यामुळे तुमच्या चेहर्‍याचा रंग उजळेल.

- Advertisement -

* तुम्ही तेलकट त्वचेला त्रासले असाल तर एक चमचा मिल्क पावडमध्ये २ चमचे ग्लिसरिन, एक चमचा बदाम पावडर, एक चमचा लिंबाचा रस आणि ‘ई’ जीवनसत्वयुक्त तेल मिसळून हा लेप १५-२० मिनिटे चेहर्‍याला लावा. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने तुम्हाला फरक जाणवेल.

* जर तुम्ही तुमचे ओठ नेहमी गुलाबी ठेऊ इच्छीत असाल तर एक चमचा ग्लिसरीनमध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा आणि दररोज ओठांना लावा. यामुळे तुमचे ओठ नियमित गुलाबी दिसतील. हे मिश्रण तुम्ही बाटलीत भरुन फ्रिझमध्ये देखील ठेऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -