घरलाईफस्टाईलतुपाच्या मदतीने खुलवा सौंदर्य

तुपाच्या मदतीने खुलवा सौंदर्य

Subscribe

तूप हे आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी तर आहेच सोबतच ते तुमचे सौंदर्यसुद्धा वाढवण्यास मदत करत.

त्वचेचे सौंदर्य खुलवण्यात तुपाची विशेष मदत होते.

नॅचरल मॉइश्चरायझर –
तुमची त्वचा जर कोरडी असेल तर कोणत्याही महागड्या क्रिमपेक्षा तूप वापरणे नक्कीच फायद्याचे ठरू शकेल.
आंघोळीच्या आदी तूप थोडे गरम करून घ्या व पूर्ण शरीराला मसाज करा. असे केल्याने आंघोळीनंतर लगेचच तुम्हाला कोमल त्वचेचा अनुभव येईल.

- Advertisement -

फुटलेल्या ओठांसाठी-
फुटलेल्या ओठांसाठी तूप वापरल्यास, ओठ लवकर मऊ होतात.तसेच जर तुम्ही दररोज ओठांना तूप लावल्यास तुमचे ओठ कधाच फाटणार नाहीत.

डार्क सर्कलपासून सुटका –
डार्क सर्कल असतील तर झोपण्यापूर्वी त्यावर तूप लावा व सकाळी धुवून टाका. हळू-हळू डार्क सर्कलची समस्या कमी होईल.

- Advertisement -

चमकदार त्वचेसाठी –
तुमची त्वचा चमकदार व्हावी असे वाटत असेल तर, चिमूटभर हळद तुपात मिसळा आणि चेहर्‍यावर लावून वीस मिनिटांनी धुवून टाका.

केसांच्या वाढीसाठी-
केस दुभंगण्याची समस्या सर्वच मुलींना असते. यासाठी तूप घ्या, पूर्ण विरघळेपर्यंयत गरम करा. हलक्या हातांनी केसांवर लावा, एका तासाने धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून तीनदा करा आणि मग बघा तुमचे केस कसे घनदाट होतात ते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -