सुडौल बांध्यासाठी महिला ‘हे’ करतात

protein supplements
प्रोटिन सप्लिमेंट

वय कितीही असो, ‘सुडौल’ बांधा हा महिलांचा वीक पॉईंट असतो. मग त्यासाठी ‘व्यायाम’, ‘डाएट करायला महिला तयार असतात. वेळप्रसंगी पैसे खर्च करण्याचीही त्यांची तयारी असते. पण आता पुरुषांच्या फिटनेसमधला एक फंडा अमलात आणला तरी महिला सुडौल बांधा कमवू शकतात. तसा हा फिटनेस फंडा काही नवा नाही. पण यातील गैरसमज दूर झाल्याने याची मागणी आता वाढताना दिसत आहे.

शरीरावर, त्वचेवर कोणतेही विपरीत परिणाम होऊ नये, याची काळजी महिला अधिक घेतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे साईड इफेक्ट तर होणार नाही ना? या भीतीपोटी काही नवीन ट्राय करायला  महिला ‘का- कू’ करतात. त्यात सुडौल बांध्यासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रोटीन सप्लिमेंटसंदर्भातही असेच गैरसमज होते. पण आता महिलांचा ‘प्रोटीन सप्लिमेंट’ घेण्याचा कल वाढला असून त्यांची मागणी वाढल्याचे वॉशिंग्टन येथील एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

प्रोटीन सप्लिमेंट संदर्भातील गैरसमज

शरीर कमावण्यासाठी पुरुष हमखास प्रोटीन घेतात. पण या प्रोटीनचे परिणाम पाहता पुरुषांप्रमाणे शरीरात बदल होतील का? असा सर्वसाधारण प्रश्न महिलांना पडतो. प्रोटीनमुळे जडत्व येते, असा समज महिलांमध्ये होता. त्यामुळे अशी कृत्रिम सप्लिमेंट घेण्यासाठी महिला कचरत होत्या.

वर्क आऊट सोबत प्रोटिन्स

women doing exercise
फोटो प्रातिनिधीक आहे

नुसतंच वर्क आऊट करुन शरीर बनवता येत नाही. म्हणजे जर तुम्ही सुडौल बांधा मिळवण्यासाठी धडपडत असाल, व्यायाम करत असाल. पण तुम्हाला हवा तसा बदल शरीरात दिसत नसेल. याचाच अर्थ तुम्ही कुठेतरी चुकत आहात. कारण डाएटसोबत तुमच्या शरीरात प्रोटिन्सचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. या प्रोटिन सप्लिमेंट तुम्हाला तेच पुरविण्याचे काम करतात. त्यामुळे वर्कआऊट सोबत प्रोटिन्स घेण्याचा सल्ला दिला जातो.

 

सहा आठवड्यात झाला बदल

वॉशिंग्टनच्या संशोधन करणाऱ्या टीमने ६ आठवडे प्रोटिन सप्लिमेंटचा अधिक अभ्यास केला. यातून असे निदर्शनास आले की, जर योग्य व्यायाम, योग्य खानपान पद्धती आणि पुरेशा प्रमाणात

प्रोटिन सप्लिमेंट घेतल्यास तुम्हाला हवे तसे सुडौल शरीर मिळू शकते. पण प्रोटिन सप्लिमेंट घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here