जागतिक ग्राहक दिन: जागो ग्राहक जागो…

प्रत्येक वर्षी १५ मार्च रोजी हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो.  म्हणून २५ डिसेंबर हा दिवस भारतीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.

Mumbai
जागतिक ग्राहक दिन

ग्राहक हा बाजारपेठेचा राजा म्हणून ओळखला जातो. हाच ग्राहक जागतिकीकरणाच्या युगात अतिशय महत्त्वाचा आहे. डिजीटलायझेशनच्या युगात देखील ग्राहक बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल तसेच खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू ठरतो. मात्र माध्यमातील काल्पनिक, रंजक आणि आकर्षक जाहिरातीमुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. ग्राहकांनी अशा प्रलोभनांना न भुलता, फसवणूक झाल्यास काय करावे हे बऱ्याचदा त्यास कळत नाही.

युनेस्कोकडून मान्यता 

भारतामध्ये २५ डिसेंबर १९८६ रोजी कायदा करण्यात आला होता. परंतु,  ग्राहकांना सेवा देतांना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले. याबाबत जागतिक स्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्याला युनेस्कोकडूनही मान्यता मिळाली. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक वर्षी १५ मार्च रोजी हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो.  म्हणून २५ डिसेंबर हा दिवस भारतीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.

ग्राहकांची फसवणूक झाल्यास

ग्राहकास वस्तू खरेदी करतांना, एखादी वस्तू निवडतांना, त्याची गुणवत्ता, दर्जा त्याचे प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार असतो. हा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्यानुसार (१९८६) ग्राहकांना देण्यात आला आहे. ग्राहकांची फसवणूक झाली तर,  जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असते. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ग्राहक न्यायालय देखील कार्यरत असते.

ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहकांनी लिखित स्वरूपात तक्रार करावी. तक्रार निवारण केंद्रामध्ये तक्रार देत असताना दोन प्रती लिखित स्वरूपात तयार कराव्यात. एक प्रत जमा करून दुसऱ्या प्रतीवर कार्यालयाचा शिक्का, अधिकृत सही, दिनांक व वेळ लिहून घ्यावी. जेणेकरून भविष्यामध्ये जर तक्रार गहाळ झाली तर आपण आपल्याकडील प्रत दाखवून दाद मागता येऊ शकते.

ऑनलाईन वस्तू खरेदी करताय

ऑनलाईन वस्तू खरेदी करतांना ग्राहकांनी काळजी घेतली पाहिजे, ज्या कंपनीकडून फसवणूक झाली तर त्या कंपनीकडे पहिल्यांदा तक्रार करावी. त्यानंतर ग्राहकांनी ग्राहक न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी.

फसव्या जाहिरातीपासून सावधान

सौंदर्य प्रसाधनाच्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्या जातात. एखाद्या क्रीमने गोरे व्हाल, त्वचा उजळेल अशा जाहिराती सर्रास बघायला मिळतात .अशा प्रकारच्या जाहिरातींना बळी न पडता सद्बुद्धीने विचार करून कोणतेही उत्पादन खरेदी करावे आणि फसव्या जाहिरातीपासून सावध रहायला हवे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here