घरलाईफस्टाईलInternational Yoga Day: महिलांकरिता 'योग'साधना महत्त्वाची

International Yoga Day: महिलांकरिता ‘योग’साधना महत्त्वाची

Subscribe

महिलांना स्वतःच्या वेळापत्रकात योगाचा समावेश आवर्जून करायला हवा.

जागतिक योग दिवस हा सर्वत्र २१ जून रोजी साजरा केला जातो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाचा एक प्रकार म्हणून योगाकडे पाहिले जाते. योगसाधना कोणत्याही अध्यात्माला तसेच धर्माला अनुसरून नसल्याने योगसोधनेकडे फक्त व्यायाम प्रकार म्हणून ओळखले जाते.

- Advertisement -

दिवसाच्या संपुर्ण कामाचे शेड्यूल तसेच कामाच्या गडबडीत महिलांना स्वतःची काळजी घेण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही महिला नियमित व्यायाम आणि योगा करण्यास वेळ काढत नाही तर घरातील कामं करून होतच असेल की, व्यायाम असा गैरसमज त्याचा असतो. मात्र महिलांना स्वतःच्या वेळापत्रकात योगाचा समावेश आवर्जून करायला हवा.

नियमित योगा केल्याने सर्वांचे शरिर स्वस्थ राहून तणावासंबधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यास देखील मदत होते. उच्च रक्त दाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा या समस्यांवर योगा रामबाण उपाय आहे. सकाळी दिवस सुरू झाल्यापासून ते रात्री दिवस संपेपर्यंत महिला वर्ग कामातच गुंतलेले असतो. दिवसाच्या संपुर्ण कामाचे शेड्यूल तसेच कामाच्या गडबडीत महिलांना स्वतःची काळजी घेण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

महिलांकरिता असणारे योगाचे महत्त्व

  • रोज नियमित महिलांना वेळ काढून काही मिनिटे योगा केल्यास दिवसभराच्या कामाचा थकवा न जाणवता दिवसभर ताजेतवाने राहण्यास मगत होईल. तसेत उत्साही राहता येईल.
  • दैनंदिन कार्यक्रमात महिला वर्गाने योगाचा समावेश केला तर शरिर सशक्त, चपळ आणि लवचिक बनण्यास मदत होईल.
  • महिला दिवसभर कामात गुंतलेले असल्याने स्वतःच्या आरोग्याकडे नीटसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे रोज योगा केला तर शरिराच्या स्नायूंना बळकटी मिलण्यास मदत होईल.
  • अनेकदा महिलांना गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर वजन वाढण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या वजनावर नियंत्रण मिळवण्यास योगसाधना करणे आवश्यक आहे. तसेच गर्भधारणा, चांगली प्रसुती व्हावी याकरिता महिलांना योग करणे आवश्यक आहे.
  • मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या आजारांचा दूर करण्याकरिता योगा महत्त्वाचा आहे. या योगामुळे पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना बऱ्या होण्यास मदत होते. त्यामुळे महिलांना योगा करणे गरजेचे आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -